महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : जिर्ण झालेल्या इमारती पाडल्यामुळे मोकळ्या झालेल्या जागेवर आतमध्ये सभागृह व बाहेरुन व्यापारी संकुल उभारण्यात यावे,अशी मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा भाजपा किसान आघाडीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांनी केली आहे.भद्रावती शहरातील वडाच्या झाडाजवळील जि.प.प्रा.मुलांची शाळा व जैन मंदिर गेट जवळील जि.प.प्रा.मुलींची शाळा या दोन्ही शाळांच्या इमारती जिर्ण झाल्यामुळे जि.प.ने पाडल्या. त्यामुळे तेथे आता मोकळी जागा निर्माण झाली आहे. या दोन्ही जागांवर मध्ये सभागृह आणि बाहेरील भागात व्यापारी संकुल उभारल्यास करोडो रुपये पगडीच्या स्वरुपात आणि लाखो रुपये उत्पन्नाच्या स्वरुपात जि.प.ला प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांनी दखल घेऊन त्वरित बांधकाम सुरू करावे, अशीही मागणी चंद्रकांत गुंडावार यांनी केली आहे.