वंचित चे सुनिल फाटकर
1477 मतांनी विजयी
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर पंचायत समिती जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुकीचे निकाल बुधवारी घोषित करण्यात आले यामध्ये पातुर तालुक्यात वंचित बहुजन आघाडी ने आघाडी मिळवली असून पातुर तालुक्यात वर्चस्व निर्माण केले आहे यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सुनील माणिकराव फाटकर हे 4487 मते घेऊन 1477 मतांनी विजय झाला आहे त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले शिवसेनेचे उमेदवार अरुण मारुती कचाले यांना 3010 असे मतदान पडले असून भाजपाचे उमेदवार बाळू भाऊ उर्फ अनंता नामदेव बगाडे यांना 2179 तर काँग्रेसचे उमेदवार शरद श्रीकृष्ण अमानकर यांना 10 59 आणि आरपीआय आठवले गटाचे उमेदवार सागर संजय इंगळे यांना 192 मते मिळाली आहेत यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सुनील फाटकर यांनी दणदणीत विजय मिळवून शिर्ला मतदारसंघावर पुन्हा आपले वर्चस्व कायम ठेवण्यामध्ये यश मिळवले आहे.तर पंचायत समिती करता झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे पातुर पंचायत समितीचे गटनेते तथा शहर प्रमुख अजय ढोणे यांच्या पत्नी सौ मनीषा ढोणे ह्या शिवसेनेच्या उमेदार होत्या यामध्ये मनीषा ढोणे यांना 22 85 मते मिळाली आहेत त्यांनी 485 मतांनी विजय मिळविला असून वंचित बहुजन आघाडी च्या जमीला बानु जाफर शाह यांचा पराभव केला आहे जमीला बानो यांना 1800 मते मिळाली आहेत तर भाजपा पुरस्कृत उमेदवार मंगेश गाडगे यांच्या आई श्रीमती रेणुका गजानन गाडगे यांना 1013 मते मिळाली आहेत तर काँग्रेसच्या उमेदवार नसरीन बानो मोहम्मद जहीर यांना 610 मते मिळाली आहेत तर बसपाच्या उमेदवार भाग्यश्री बाबाराव गवई यांना 220 मते मिळाली आहेत यामध्ये शिवसेनेने आपली जागा कायम ठेवून वर्चस्व सिद्ध केले आहे. तसेच पातुर पंचायत समितीच्या खानापूर सर्वसाधारण महिलां गणातील निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी च्या सौ सुनीता अर्जुन टप्पे ह्या 2551 मते घेऊन विजय झाले असून त्यांनी शिवसेनेच्या सौ प्रतिभा सुनिल गाडगे यांचा 174 मतांनी पराभव केला आहे. प्रतिभा गाडगे यांना 23 77 मते मिळाली आहेत तर भाजपचे उमेदवार संगीता गोपाल गालट यांना 449 मते मिळाली आहेत आणि काँग्रेसच्या उमेदवार रुखमाबाई विठोबा व्यवहारे यांना 39 मते मिळाली आहेत या गणांमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडी ने पुन्हा या मतदारसंघांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे तसेच पातुर पंचायत समितीच्या आलेगाव सर्वसाधारण निर्वाचक गणातील पोटनिवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी ने आपले नवीन खाते उघडून आलेगाव पंचायत समिती स्तरावर वर्चस्व निर्माण करून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे खान इमरान खान मुमताज खान हे 1998 मते घेऊन विजयी झाले आहेत त्यांनी भाजपाचे राजेश मोहन काळपांडे यांचा 298 मतांनी पराभव केला आहे राजेश काळपांडे यांना 1702 मते मिळाली आहेत तर शिवसेनेचे दत्तात्रय प्रकाश राऊत यांना 858 मते मिळाली आहेत तर काँग्रेसच्या सय्यद जुनेद सय्यद ईसा यांना 745 मते मिळाली आहेत विजयी उमेदवारांचे स्वागत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून मिरवणूक काढून केले आहे सदर निवडणूक पार पाडण्याकरता पातुर चे तहसीलदार दिपक बाजड तसेच त्यांचे सहकारी सय्यद अहेसानोद्दीन श्री खेळकर, नीवडणूक विभागाचे कर्मचारी नायब तहसीलदार निवडणूक कर्मचारी पातूरचे ठाणेदार हरीश गवळी, चान्नी चे ठाणेदार राहुल वाघ यांनी या कामी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता सदर मतदान मोजणी ची प्रक्रिया शांतते मध्ये पार पडली पातुर तालुक्यात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी ने आपले वर्चस्व कायम केले आहे.


