जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातूर
लातुर / निलंगा तालुक्यातील गु-हाळ गावात आज दुपारी ३ वाजता बाहेरगावावरून घरी येऊन शेषाबाई मारूती दुधभाते वय ६५ वर्षे या आपल्या शेतात आल्या बाजूच्या शेतात दबाधरून बसलेल्या अज्ञात आरोपीने सदरील महिलेच्या जवळ येऊन गळ्यातील सोन्याची बोरमाळ मंगळसुञ कानातील असे एकून चार तोळे सोने हिसका मारून काढून घेतले. महिलेने आरडाओरडा करताच आरोपीने त्याच्या हातातील लोखंडी सुरीने गळा कापून आरोपी बाजूच्या तळीखेड वाटेने उसातून पळून गेला आहे. लातूर जिल्ह्यात आरोपी पकडण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली असून सध्या परीसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून बाजूच्या शेतात काम करणारे शेतकरी धावून आले असता सदरील आरोपी पळून गेला आहे.प्रत्यक्षदृषी पहाणा-यानी सदरील व्यक्तीच्या अंगावर काळा पँन्ट व पांढरा शर्ट होता असे सांगितले आहे.उपविभागीय अधिकारी दिनेशकुमार कोल्हे पोलिस निरिक्षक बी.आर.शेजाळ यानी घटनास्थळाचा पंचनामा केला असून प्रेत शेवविच्छेदनासाठी निलंगा येथील उपविभागीय दवाखान्यात पाठवण्यात आला आहे.










