किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
आज दिनांक 6 /10/ 2021रोजी गोंधळवाडी येथे दुपारी दोन वाजता किसन उर्फ श्रीकृष्ण तुकाराम देवकर वय अंदाजा 32 वर्ष रा. गोंधळवाडी व तुकाराम नामदेव देवकर वय अंदाजे 58 वर्ष रा. गोंधळवाडी हे शेतात काम करीत असताना यांचे अंगावर अंदाजे 2 वाजता वीज पडल्यामुळे जखमी झाले होते त्यांना पुढील उपचाराकरिता अकोला येथील सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आले होते वरीलपैकी किसन उर्फ श्रीकृष्ण तुकाराम देवकर यांचा अंदाजे 5 वाजता मृत्यू झाला आहे तर त्यांच्या वडिलांची तब्येत सिरीयस असल्याची माहिती शासकीय कार्यालयातून मिळत आहे