वनपरिक्षेत्र कार्यालय मार्कंडा (कंसोबा) च्या प्रयत्नाला यश.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/आष्टी:-गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील आष्टी परीसरात नरभक्षक बिबट्याने महीन्याभरापासुन धुमाकुळ माजविला होता.त्यामुळे परिसरातील नागरिक मोठ्या दहशतीत होते.अखेर त्या नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्यात वनविभागास यश आले आहे.या नरभक्षक बिबट्याने आष्टी परिसरातील दोन व्यक्तीला जिवे मारले तर तिन व्यक्तीला गंभीर जखमी केले होते.सदर बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश मुख्य वन्यजीव संरक्षक नागपूर यांचेकडून आदेश काही दिवसापुर्वी वनविभागाला प्राप्त झाले होते.त्या अनुषंगाने आष्टी पेपर मील वसाहती मध्ये त्याचा वावर जास्त प्रमाणात असल्याने त्या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिन पिंजरे लावले होते.1आक्टोंबर 2021 ला रात्री 8.00 वा.आष्टी पेपरमिल वसाहतीत ठेवलेल्या पिंजर्यात बिबट्या शिरला . तेव्हा त्याला सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले असुन त्याच्या सुरक्षेची खबरदारी घेतली जात आहे.त्याच बरोबर चामोर्शी चे पशुधन विकास अधिकारी यांनी बिबट्याची आरोग्य तपासणी केली व तसा अहवाल दिला.जेरबंद बिबट्यास निसर्ग अधिवासात मुक्त करावे किंवा गोरेवाडा रेस्क्यू सेंटर नागपूर येथे हलविण्यात यावे यासाठी दि.4आक्टोंबर2021ला एसआेपी समितीची वनपरिक्षेत्र कार्यालय मार्कंडा (कंसोबा) येथे सभेचे आयोजित करण्यात आले.या सभेत जेरबंद बिबट्यास नागपूर येथे हलविण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार वनसंरक्षक गडचिरोली वनवृत यांचेकडे जेरबंद बिबट्यास गोरेवाडा रेस्क्यू सेंटर नागपूर येथे हलविण्याची परवानगी मागितली आहे.परवानगी प्राप्त होताच नागपूर ला हलविण्यात येणार आहे.सदर कारवाई वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत मार्कंडा(कंसोबा) यांनी व्यवस्थीत पार पाडली.