किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत
पातुर तालुका विकास मंचाची आग्रही मागणी..अकोला जिल्हा महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांच्या विकासाच्या तुलनेत खूप मागे आहे.दुष्काळी व मागासलेला जिल्हा म्हणून आज त्याची ओळख आहे.यातुन आपल्या जिल्ह्याला बाहेर काढण्यासाठी जिल्ह्यातील दळणवळणाच्या व्यवस्थेचे जाळे व्यापक स्वरूपात निर्माण करण्याची खुप आवश्यकता आहे.जिल्ह्याच्या तालुक्यांमध्ये अनेक रस्त्यांची दुर्धर अवस्था झाली आहे.जिर्ण व धोकादायक या रस्त्यांवरून जातांना वेळ जातो,पैसा जातो आणी वाहन अपघातात जीव ही जातो.अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणारे रस्ते,राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्गांत परिवर्तित करून त्यांचे चौपदरीकरण करावे जेणेकरून शेतकरी वर्गाचे राहणीमान उंचावेल,छोटे मोठे उद्योग व्यवसायांना उभारी मिळेल,बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तसेच कमी मुल्य असलेल्या जमिनींच्या दरांत चांगली वृद्धी होईल,नदी,नाले,तलाव यांचे खोलीकरण वाढेल त्यामुळे आपोआपच पाणी साठा वाढून शेती करीता व पिण्याच्या पाण्याची कमतरता भरून निघेल,संपुर्ण परिसर हिरवागार होवून पर्यटकांना आकर्षित करेल,वायु प्रदुषणाचा प्रभाव कमी होईल पर्यायाने नागरिकांचे आरोग्य सुधारेल असे अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात असे ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी सांगितले.
पातुर तालुका विकास मंचानी दिलेल्या प्रस्तावात पुढीलप्रमाणे विकासात्मक महत्त्वपूर्ण मागण्या नमुद केलेल्या आहेत त्यामध्ये पातुर,आलेगाव, मेहकर हा ८० किमी चा चौपदरी दहा उड्डाणपूल असलेला रोड अंदाजे किंमत २०० कोटी रुपये, – पातुर,धाबा,बार्शीटाकळी,शेलू बाजार सहा उड्डाणपूल असलेला ६० किमी चौपदरी रोड अंदाजे किंमत १६० कोटी रुपये,- पातुर,बाळापूर, खामगाव,शेगाव,अकोट,दर्यापूर, मुर्तिजापूर,मंगरूळपीर या गावांना जोडणारा ४०० किमीचा आठ पदरी रिंग रोड अंदाजे किंमत १००० कोटी रुपये, तसेच अकोला,पातुर,मालेगांव,वाशीम. अकोला,वाडेगाव, बाळापूर, खामगाव, शेगांव. अकोला,अकोट,अंजनगाव सुर्जी, चिखलदरा. – अकोला,बार्शीटाकळी, मंगरूळपीर या गावांसाठी पर्यावरण पुरक इलेक्ट्रीक वर चालणा-या मोनोरेल प्रकल्प अंतर ६०० किमी अंदाजे किंमत ५००० कोटी रुपये अशी जवळपास ६३६० कोटी रुपयांच्या ह्या कामांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मंजुरी द्यावी आणी अकोला जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करावे अशा स्वरूपाची माहिती पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी यावेळी दिली आहे.
पुण्यात झालेल्या मंत्री महोदय यांच्या दौ-यात ठाकूर यांनी त्यांची भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी यासंदर्भात लेखी प्रस्ताव देण्याची सुचना केली होती त्यानुसार हा प्रस्ताव अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत त्यांना पाठवण्यात आला आहे.
या प्रसंगी पातुर तालुका विकास मंचाचे पदाधिकारी किरणकुमार निमकंडे,विठ्ठल डिके,रणजीत गाडेकर, योगेश फुलारी,गणेश गाडगे,मेजर रवी श्रीनाथ,डॉ विलास हिरळकार,महेश बोचरे,जाहिद खान,मधुकर राखोंडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.


