गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा :-तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण-नेर फाटा या मार्गावर दोन ठिकाणी मोठे खड्डे पडली असून जणू अपघाताला निमंत्रण देत असून खड्डे दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिक व वाहनधारकांनी केली आहे. पंचगव्हाण- नेर फाटा या मार्गावर नरसीपुर स्मशानभूमी जवळ व गावाला लागून असलेल्या टि-पॉईंट जवळील रफट्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहे तेव्हा अकोला,अकोट, चौहोटा, देवरी जाण्यासाठी हा मार्ग जवळचा असल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.तसेच या मार्गावर तेल्हारा आगाराची बस सुद्धा सुरू आहे तेव्हा एकाच वेळी दोन वाहने सामोरा-समोर आल्यास खड्डा चुकविण्याच्या नादात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन खड्डे दुरुस्ती करावे.


