सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली/आष्टी- आष्टी-ईलूर पेपरमील वसाहतील परिसरात नरभक्षक बिपट्याने दिवसाधवळ्या धुमाकुळ माजविला असुन या परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडने सुद्धा कठिण परिस्थिती निर्माण झालेली आहे.त्यामुळे या परिसरात भितीचे वातावरण आहे. दि. 29 सप्टेबर रोजी सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान आष्टी-ईलुर वसाहतील 43 क्रमांक क्वार्टर मध्ये राहणारी बबीता दिलीप मंडल वय 40 हि महीला अंगणात भांडे घासत असतांना अचानक पणे बिबट्याने हल्ला करुन तिच्या गळ्याला पकडुन गंभीर जखमी केले.तेव्हाच तिचा मुलगा कुनाल मंडल वेळेवर बिबट्याच्या दिशेने हातात काठी घेवुन धाव घेतली व नरभक्षक बिबट्याच्या तावडीतून आईला सोडविले.त्यामुळे तिचे प्राण वाचले.या परीसरातील ही चौथी घटना असून आतापर्यंत तिन जखमी तर एका मुलाचा मृत्यू झाला होता.माञ या परिसरात नरभक्षक बिबट्याकडुन वारंवार हल्ले होत असतांना सुद्धा वनविभागाचे अधिकारी या बिबट्याचा बंदोबस्त करण्यास दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. सदर महिला गंभीर जखमी असून तिला ग्रामिण रुग्णालय आष्टी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर ला हलविण्यात येणार आहे.सदर घटनेचा निषेध अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक खंडारे व परिसरातील नागरिकांनी केली असून बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.