पठाण जैद
तालुका प्रतिनिधि औसा
औसा लातुर : तालुक्यातील उजनी गावात तेरणा नदीचे पाणी घुसले असून सोमवारच्या पावसाचे प्रचंड नुकसान झाले आहे . तेरणा नदीची पाणी पातळी वाढत असल्याने तुळजापूर सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ हा वाहतूकीस बंद करण्यात आला आहे .तेरणा नदीने रुद्र रूप धारण केले असून नदीच्या पाण्याने येथील बाजार चौकात मंगळवारी शिरले आहे .. पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असल्याने येथील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेती व पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे सोयाबिन, उडीद, मूग आदीं पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे . औसा , लामजना , बेलकुंड , भादा , किल्लारी , मातोळा ,किनीथोट या सातही महसूल मंडळातील गावांना या पावसाचा फटका बसला आहे. अगोदरच बाजारपेठेत सोयाबीन पिकाचे दर कोसळत असताना आता पावसामुळे पिके पूर्णतः गेल्याने शेतकरीही पुरता कोसळून गेला आहे.यामुळें शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या पिकावर संपुर्ण आर्थिक गणित अवलंबून होते. शेतकऱ्याने जी स्वप्ने पाहिली होती ती सर्व पावसाच्या पाण्यात विरघळून गेल्याचे चित्र आहे .


