धुळे ; अधिकारनामा
ते म्हणाले, तेव्हा मी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होतो. माझ्यासमोर बाळासाहेब ठाकरे यांची फाइल आली. त्याआधी शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भातील सर्व फाइल्स निकाली काढण्यात आल्या होत्या. एवढी एकच फाइल प्रलंबित होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना मेळाव्यात आम्ही श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारशीनुसार कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते.वृत्तसेवा
मातोश्री : श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्रास देण्याचा कोणताही विचार नव्हता. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला नसता, तर मातोश्री लाच तुरुंग घोषित करणार होतो. तेव्हाच्या सर्वच गोष्टी सांगता येत नाहीत. पण आता वीस वर्षांचा काळ लोटला असल्याने काही बाबी उघड करीत आहोत, असा खुलासा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला.
एका कार्यक्रमासाठी येथे आलेल्या ना. भुजबळ यांनी रविवारी (दि. 26) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वीस वर्षांपूर्वीच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकनाट्यातील काही अलक्षित पैलूंना उजाळा दिला.











