गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा :- आगामी तेल्हारा नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासंदर्भात ११ सप्टेंबरला रात्री ७ वाजता माहेश्वरी भवन तेल्हारा येथे तेल्हारा विकास मंच च्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे .समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन अठरा पगड जाती सह बारा बलुतेदारांनच्या सहकार्याने तेल्हारा विकास मंच ची स्थापना झाली असून आगामी नगर परिषद निवडणुकीची व्यूहरचना ठरविन्या करिता तसेच मार्गदर्शक सल्लागार समिती गठित करणे व इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आदी विषयावर चर्चा विनिमय करून निर्णय घेण्याकरिता तेल्हारा विकास मंचची बैठक ११ सप्टेंबरला रात्री ७ वाजता माहेश्वरी भवन तेल्हारा येथे आयोजित करण्यात आली आहे सदर बैठकीला विकास मंच च्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तसेच ज्यांना विकास मध्ये सहभागी व्हायचे आहे.असे सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन तेल्हारा विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ फाटकर यांनी केले आहे .


