महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.७:-यावर्षी सुद्धा बैल पोळा तसेच तान्हा पोळ्यावरही कोरोनाचे सावट असल्याने अनेक बालकांनी घरीच राहून तान्हा पोळ्याचा आनंद साजरा करावा लागला.याच पार्श्वभूमीवर भद्रावती येथील सुरक्षा नगरातील गावंडे परिवारातील बालकांतर्फे तान्हा पोळ्या निमित्य घरीच राहून नंदीबैलाची आकर्षक सजावट करून डेंग्यू व मलेरिया ची जनजागृती करण्यात आली.
सध्या डेंग्यू व मलेरियाची साथ सुरू आहे.त्यामुळे अनेक लोकांना यापासून जीव सुद्धा गमवावा लागला आहे.म्हणूनच लोकांमध्ये डेंगू विषयी जागृती निर्माण व्हावी व यापुढे कोणावरही हे संकट येऊ नये. या हेतूने तान्हा पोळ्याचे औचित्य साधून गावंडे परिवाराने डेंगू वर आधारित देखावा निर्माण करून या रोगाविषयी घ्यावयाची काळजी ,लक्षणे,उपचार,त्याच प्रमाणे वयक्तिक व परिसराची स्वच्छता प्रत्येकाने केली पाहिजे हा संदेश देण्यात दिला.या देखाव्यामध्ये उन्नती अमोल गावंडे हिने ‘चल चल भाई करे सफाई, कुडा कचरा साफ करे’ या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या भजनातून सर्वांनी स्वच्छता केली पाहिजे असा संदेश दिला.विधी दीपक आसुटकर या बालिकेने परिसर स्वच्छ केला. हार्दिक विशाल गावंडे या बालकाने राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा स्वच्छतेविषयीचा संदेश दिला.तसेच वेदांती अमोल गावंडे हिने ग्रामगीता मधील ओव्यांच्या माध्यमातून सर्वांनी रोग मुक्तीसाठी साफसफाई करणे गरजेचे आहे असे सांगितले.येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे निष्ठावान कार्यकर्ते स्व.जगन्नाथजी गावंडे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी सार्वजनिक ठिकाणी भरणाऱ्या तान्हा पोळ्यात समाजप्रबोधन देखावे सर्वांसाठी आकर्षक ठरत होते.यंदाही ती परंपरा तशीच सुरू ठेवत कोरोनाच्या संकटात सुद्धा घरूनच डेंग्यू या आजाराविषयी जनजागृती करण्यात आली.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)