महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.7:-येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मानवाधिकार संघटनेचे जिल्हा प्रमुख विनायक गरमडे यांच्या मातोश्री कमलताई आनंदराव गरमडे यांचे आज दि.६ सप्टेंबर रोजी पहाटे ३.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात २ मुले, सुना, मुलगी आणि नातवंडे असा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर येथील पिंडोनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील नागरिक व आप्तेष्ट उपस्थित होते.


