नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी राबविली विशेष मोहीम.
गणेश खराट
जिल्हा प्रतिनिधी नाशिक
नाशिक शहरात मागील महिन्या पासून म्हणजे 15 ऑगस्ट पासून नाशिक चे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशिक शहरात नो हेल्मेट नो पेट्रोल ही योजना तयार केली असून त्याचा प्रतिसाद सुद्धा शहरात पहिले तसा मिळत नसून त्यासाठी दिनांक 9/9/2921 पासून आता कडक पाऊल उचलण्याचे ठरविले आहे. या धडक कारवाई मुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा कमी होईल असे मत नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी व्यक्त केले आहे.काढली धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे चार युनिटनिहाय भरारी पथके तयार करण्यात येणार आहेत. रस्त्यावर बॅरिकेडिंग लावण्यात येऊन विनाहेल्मेट दुचाकी अडवत पुरुष, महिला चालकांचे वाहन ताब्यात घेतले जाईल. संबंधित चालकाला पोलिस वाहनातून समुपदेशनसाठी नाशिक फर्स्ट समुपदेशन केंद्रावर तज्ज्ञांकडून दोन तासांचे समुपदेशन केले जाईल. या समुपदेशनाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच संबंधित चालकाला वाहन परत दिले जाणार आहे. समुपदेशन प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच मिळेल वाहन, अधिसूचना जारी केली आहे.