गटबाजीला बाजूला ठेऊन पक्ष संघटन करावे- डॉ.सतिश वारजूकर
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर – आज दि.०५/०९/२०२१ रोज रविवारला तालुका काँग्रेस कार्यालय नागभीड, येथे ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समनव्यक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता डॉ. सतिश वारजूकर यांचा अध्यक्षतेखाली पार पडली या वेळी, चंद्रपूर जिल्हा कांग्रेस कमिटी सरचिटणीस विजय गावंडे, माजी महासचिव चंद्रपूर जिल्हा कांग्रेस कमिटी अविनाश अगडे, माजी अध्यक्ष चिमूर विधानसभा क्षेत्र गौतम पाटील, नागभीड तालुका युवक कांग्रेस कार्याअध्यक्ष सौरभभाऊ मूळे, रमेश ठाकरे, नगरसेवक प्रतिक भसीन, युवा कांग्रेस कार्यकर्ते अमोल वानखेडे, सरपंच मागरूड यशवंत मेश्राम, माजी सरपंच किरीमिटी मुरलीधर मोरांडे, हरीश मुळे, गिरगाव ग्राम पंचायत सरपंच प्रशांत गायकवाड, कांग्रेस कांग्रेस कार्यकर्ते ढोरपा प्रमोद उंभरकर, अमित संदोकर, सागर खोब्रागडे, सुधीर बोरकर, समीर शेख, मंगेश फुकट, योगेश सातपैसे, नंदकिशोर गायकवाड, व नागभीड तालुक्यातील युवक कांग्रेस कमिटीचे पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते. या बैठकीच्या निमित्ताने चंद्रपूर जिल्हा विद्यार्थी कांग्रेस (NSUI) चे संघटन वाढविण्यासाठी नागभीड तालुका अध्यक्ष म्हणून किरीमिटी (मेंढा) ग्रा.पं. सदस्य सूरज चौधरी, यांची निवड करण्यात आली. तसेच नागभीड शहर अध्यक्ष पदी अनंता राहुड यांची निवड झाली. त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र देऊन त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या बैठकी दरम्यान अनेक युवा कार्यकर्त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून गावातील समस्या सांगितल्या, त्यावेळी सतीश वारजूरकर यांनी गावातील सर्व समस्या पूर्ण करण्याचे पर्यंत करणार असल्याचे सांगितले.


