सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने एनसीसीच्या विद्यार्थिनी मध्ये उत्साह…
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर तालुका प्रतिनिधी….. 18 ऑगस्ट 2019 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने आता एनडीएमध्ये मुलींनाही संधी द्यावी असा निर्णय दिल्याने तुळसाबाई कावल विद्यालयातील एनसीसी मध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थिनींनी या निर्णयाचे स्वागत केले. सीमेवर लढण्यास जाण्या करिता या सावित्रीच्या लेकी झाल्या आहेत.. महाराष्ट्र बटालियन 11 एनसीसी अकोला अंतर्गत तुळसाबाई कावल विद्यालय पातुर येथे स्वर्गीय सरलाबाई गहलोत यांच्या नेतृत्वात १९६१ साली विद्यालयात एनसीसी युनिट ची स्थापना करण्यात आली… सदर विद्यालयातून आत्तापर्यंत ६२ वर्षांमध्ये हजाराहून अधिक मुली एनसीसी पास करून निघालेल्या आहेत …सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुलींनासुद्धा ह्यापुढे एनडीएची पूर्व परीक्षा देऊन देशाच्या सीमेवर संरक्षण करता येऊ शकते.
हा आत्मविश्वास मुलींमध्ये निर्माण झालेला दिसून येत आहे …म्हणून या निर्णयाचे स्वागत विद्यालयामध्ये वृक्षारोपण करून जल्लोषात करण्यात आले… राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएची पूर्व परीक्षा देऊन मुली सुद्धा यामध्ये प्रवेश घेऊ शकतात… यापूर्वी तुळसाबाई कावल विद्यालय मध्ये ए एन ओ ऑफिसर एनसीसी कामाची जबाबदारी श्रीकृष्ण माणिकराव व स्व. अजयसिंह गहिलोत सर स्व. हरीश काळे सर यांनी सांभाळली आणि आज रोजी सदर विद्यालयांमध्ये सतरा विद्यार्थिनी एनसीसीमध्ये सहभागी आहेत
या निर्णयाचे स्वागत संस्थेचे सचिव स्नेहाप्रभादेवी गहिलोत व्यवस्थापक विजयसिंह गहिलोत प्राचार्य बी. एम. वानखडे उपप्राचार्य एस. बी. ठाकरे अजितसिंह गहिलोत, जगमोहनसिंह गहिलोत, अंशुमानसिंह गहिलोत आणि एनसीसी ऑफिसर सुभाष इंगळे यांनी केले..
…………
चौकट....
एकता आणि शिस्त याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे एनसीसी आहे याचे प्रशिक्षण आम्ही विद्यालयात घेत आहोत आणि हाच ध्यास घेऊन भविष्यात देशाचे संरक्षण करण्याकरिता आम्ही सीमेवर लढण्याकरिता कंबर कसून तयार आहोत.
जे. डब्ल्यू. कोमल सुरवाडे ,सार्जंट तुळसाबाई कावल विद्यालय पातुर
चौकट….
आतापर्यंत फक्त मुलांना एनडीएमध्ये दाखल होऊन ऑफिसर बनता येत होते. परंतु आता मुलींना सुद्धा ऑफिसर बनवून देशाचे संरक्षण करता येईल त्यामुळे आता एनसीसीमध्ये असल्याचा अभिमान वाटत आहे.
जे.डब्ल्यू .गौरी सतीश सरोदे ,सार्जंट, तुळसाबाई कावल विद्यालय पातुर
चौकट…
यापूर्वी एनडीए मध्ये केवळ मुलांना संधी होती परंतु आता न्यायालयाच्या निर्णयानुसार मुलींना ही एनडीएमध्ये प्रशिक्षण मिळणार आहे देशाच्या संरक्षण विभागांमध्ये सेवा देण्याची संधी यामुळे मिळणार असल्याने आता आम्हालाही ऑफिसर होण्याची संधी मिळाली आहे.
कॅडेट भक्ती रमेश इंगळे