अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधि मालेगाव
मालेगांव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दोन वर्षांपासून धार्मिक सण उत्सवावर विरजण पडले आहे.मंदिराचे दरवाजे बंद आहेत. वेळोवेळो शासनाच्या वतीने मार्गदर्शन सूचना दिल्या जात आहेत.त्याअनुषंगाने मेडशी पोलीस चौकीत पोळा आणि गणेशोत्सव संदर्भात शांतता समिती बैठकीचे आयोजन मालेगाव पोलीस स्टेशनचे नव नियुक्त ठाणेदार प्रवीण धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. बैठकीत गणेशोत्सव मिरवणूक रद्द तर पोळा सण शांततेत साजरा करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी सहायक पोलिस निरीक्षक पुष्पलता वाघ , पोलिश पाटील अनिता चोथमल ,तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव साठे, तलाठी,बानाईत ,नानाभाऊ तायडे,धर्मादास चव्हाण, प्रशांत घुगे,बबन राठोड,सुभाष तायडे, जगदीश राठोड, सोहेल पठाण,गोरखनाथ भागवत,अजय चोथमल,संतोष बहादूरे, युसूफ पठाण,सुधाकर चोथमल, विठ्ठल भागवतसह सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थिती होते.. बैठकीत पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ सहायक पोलीस उपनिरीक्षक पुष्पलता वाघ I मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस कर्मचारी अमोल पाटील यांनी तर आभार शैलेश ठाकूर यांनी मानले.