प्रहार सेवक अमोल करवते यांची मागणी…
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर तालुक्यात असलेल्या दिव्यांग आणि निराधार बांधवांना योग्य वेळी प्रशासनाकडून निधीचे वाटप होत नसल्याने अनेक दिव्यांगांचे घर सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली असून याकरता पातुर तालुक्यातील प्रहार सेवक अमोल करवते यांनी हा निधी प्रशासनाने तात्काळ देण्यात यावा अशी मागणी केली असून सदर दिव्यांगा ची समस्या तात्काळ दूर न केल्यास वेळ प्रसंगी आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.सद्यस्थितीमध्ये तोरणा संपुष्टात आला असला तरी अनेक दिव्यांग बांधव गैरसोयीचे जीवन जगत आहेत केवळ त्यांची मदार ही शासनाच्या निधीवर आहे त्यांना दुसरा कुठलाही आधार नाही आहे त्यामुळे ते निधीअभावी वणवण भटकत असताना दिसत आहेत पातुर तालुक्यात गटविकास अधिकारी पातुर पंचायत समितीच्या प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने तसेच पातुर नगर परिषद च्या प्रशासनाने या बाबींची तात्काळ घ्यावी जेणेकरून निराधार असलेल्या दिव्यांगांना आधार मिळेल आणि त्यांच्या समस्या दूर होतील. याबाबतचे निवेदन सुद्धा प्रहार सेवक अमोल करवते यांनी पातुर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तसेच इतर प्रशासनाला दिले आहे त्यामुळे केंद्र बांधवांची दखल घेणे क्रम प्राप्त असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
पातूर पंचायत समिती व पातूर नगरपरिषद यांना अनेकदा दिव्यांग 5% निधी साठी निवेदन देऊन सुद्धा दिव्यांग यांना निधी दिला नाही तो निधी 8 दिवसात देण्यात यावा.अन्यथा प्रहार सेवक व दिव्यांग बांधव पंचायत समिती पातूर मध्ये आंदोलन करेल.
प्रहार सेवक पातूर
अमोल करवते











