गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-तेल्हारा तालुक्यातील ग्रामीण भागासह शहराला जोडणाऱ्या सर्व मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या कामाकरता दोन महिन्यापूर्वी या युवकाने आमरण उपोषण केले होते .पाच दिवसानंतर पालक मंत्री बच्चू कडू उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण कर्त्याला तीन दिवसात काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते .मात्र दोन महिने उलटूनही रस्त्या ला सुरुवात झाली नाही .त्यामुळे शुक्रवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी रस्ता देखरेख समितीने तहसीलदार मार्फत पालकमंत्र्यांना निवेदन देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी मागणी केली आहे. या आठ दिवसात आम्हाला सुरुवात न केल्यास तीव्र आंदोलन छळण्याचा इशारा रस्ता देखरेख समितीने निवेदन देऊन दिला आहे. रखडलेल्या विकासकामांमुळे शहराला जोडणाऱ्या चारी बाजूंच्या रस्त्यावर मोठ्या मोठ्या त्यामुळे झालेल्या अपघातात 12 जणांना जीव गमवावा लागला असून. अनेकांना अपंगत्व आली आहे रस्त्यावर टाकण्यात आलेल्या पावसाळ्यात वाहन घसरून अपघात घडत आहेत. तर वाहन चालकास वाहन चालवत चालवताना कसरत करावी लागत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे अनेकांची वाहने तसेच एसटी महामंडळाच्या बसेस झाल्या आहेत. रस्त्याची काम तरीत सुरू करण्याची मागणी रस्ता समितीने निवेदन दिले आहे.निवेदनावर विशाल नांदोकार.सचिन थाटे.डॉ.शहेजाद खान.आनंद राठी.दादाटोहरे.उज्वलदबडघाव.प्रविण पोहरकार.गजानन गायकवाड.रामा फाटकर.स्वप्नील फोकमारे.धिरज बजाज.आशिष जयस्वाल.याच्या सह्या आहेत.