अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
अकोला ( दि. ४ सप्टेंबर २१):- स्थानिक सम्यक संबोधी संस्था अकोला, बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, कापशी व माजी विद्यार्थी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील प्रोफेसर डॉ. एम. आर. इंगळे वक्तृत्व करंडक २०२१ राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दि. ३ सप्टेंबर २०२१ रोजी सम्यक संबोधी सभागृह, रणपीसे नगर, अकोला येथे करण्यात आले होते. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष होते .संपूर्ण महाराष्ट्रात मानाची समजली जाणारी ही स्पर्धा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आले होते. स्पर्धेचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी प्रा संजय खडसे यांनी केले. रणपिसे नगर येथील सम्यक संबोधी सभागृहात या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षणाधीकारी पि जे वानखडे तर प्रमुख पाहुणे प्रसिध्द उद्योजक सुगत वाघमारे होते. याप्रसंगी विचार पिठावर प्रोफेसर डॅा एम आर इंगळे,डॅा. सौ. संगीता इंगळे आणि स्पर्धेचे परिक्षक प्रा. मेघराज गाडगे, दै लोकसत्ता चे पत्रकार प्रबोध देशपांडे, पूणे विद्यापीठाचे स्वामीराज भिसे उपस्थीत होते.यावर्षी प्रथम पुरस्काराचा मानकरी ठरला धुळे येथील प्रसाद जगताप, द्वितीय पुरस्कार जळगांव येथील सारांश सोनार, तृतीय पुरस्कार मुंबई येथील यश पाटील, चतुर्थ पुरस्कार नाशिक येथील श्रृती बोरस्ते, पाचवा पुरस्कार परभणी येथील मंदार लटपटे यांना मिळाला.पाच प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात आली यामध्ये अनुक्रमे प्रथम प्रोत्साहनपर बक्षीस अकोला येथील नेहा तिवारी यांना द्वितीय यवतमाळ येथील प्रतिक्षा गुरनुले, तृतीय सातारा येथील मिथुन माने, चतुर्थ औरंगाबाद येथील रोहीत पेटारे, पाचवे धुळे येथील प्रफुल्ल माळी यांना मिळाले.बक्षीसांची रक्कम अनुक्रमे 7000 हजार, 5000 हजार,3000 हजार, 2000 हजार, 1500रु होती सोबत ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे रु 1000 ची पाच प्रोत्साहनपर बक्षीसे व प्रमाणपत्र देण्यात आली. स्पर्धेला मिळत असलेला प्रतिसाद पाहुन परिक्षक आणि मान्यवरांनी आयोजकांचे स्पर्धा आयोजना बद्दल आभार व्यक्त केले आणि भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा जाईल असा आशावाद दाखविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभय तायडे यांनी संचालन वैष्णवी हागोणे यांनी तर आभार प्रदर्शन विशाल नंदागवळी यांनी केले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी कृती समीती चे प्रा राहुल माहुरे, प्रा आकाश हराळ,कुणाल मेश्राम, अजिंक्य धेवडे, विशाल नंदागवळी, राहुल कुरे, अमीत लोंढे, विशाल इंगळे, आदित्य बावनगडे,रोहन काळे, सागर तेलगोटे, श्रेयश शर्मा, ,शशिकांत इंगळे,अमित वाहूरवाघ,प्रविण जामनिक,सुरज राजपुत,नागसेन अंभोरे, आकाश जाधव,आनंद धानोरकर, भरत चांदवडकर यांनी अथक परिश्रम घेतले.











