योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर – नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील मुस्लिम कब्रस्थान जवळील चंद्रपूर-नागपूर महामार्गांवर घडलेल्या दुचाकीच्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून एक किरकोळ जखमी आहे. जखमीचे नाव गोविंदा गायकवाड ओवाळा व घनशाम मोहुर्ले ओवाळा असे आहे. घनशाम मोहुर्ले व गोविंदा गायकवाड हे दोघेही सिंदेवाहीकडून सावरगावच्या दिशेने येत होते दरम्यान चंद्रपूर -नागपूर महामार्गांवर असलेल्या सावरगाव येथील मुस्लिम कब्रस्थान जवळ कुत्री आडवी आल्याने दु-चाकी चालक (गाडी नंबर एम.एच 34 बी, एक्स 5449) घनशाम मोहुर्लेचा वाहनावरील ताबा सुटून दोघेही खाली कोसळले.यामध्ये कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला असून गोविंदा गायकवाड गंभीर जखमी झाला असून घनशाम मोहुर्ले यांना किरकोळ मार लागलेला आहे. जखमींना सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक डी.आर.शेंडे यांच्या मार्गदर्शखाली प्रभाकर मंगाम व सुधाकर भानारकर हे पोलीस कर्मचारी करीत आहेत.











