सादिक शहा
सर्कल प्रतिनिधी रायपुर
बुलढाणा : येणारा गणेशोत्सव बैलपोळा गावकऱ्यांनी शांततेत तसेच कोरोनाचे नियम पाळून साजरे करावे. असे नवनिर्वाचित रायपूरचे ठाणेदार राजवंत आठवले यांनी शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित नागरिकांना आवाहन केले. रायपूर पोलीस स्टेशन मध्ये शांतता समितीची बैठक ठाणेदार राजवन्त आठवले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीला रायपूर गावातील प्रतिष्ठित लोक प्रतिनिधी व तंटामुक्ती अध्यक्ष शांतता समिती सदस्य पत्रकार सरपंच ग्रामपंचायत सदस्य आदींची उपस्थिती होती.