गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा :- तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड शहराला नगरपंचायत घोषित करा अशी मागणी ग्रामस्थ गेल्या 22 वर्षांपासून करत आहेत आणि हे मागणी पूर्ण करण्यासाठी मंत्री महोदयांनी 2 महिन्याचा वेळ मागितला असताना हिवरखेड ग्रामपंचायत मध्ये दि. २१/०८/२०२१ रोजी नगरपंचायत करू नये लोकसंख्येच्या आधारे २ ग्रामपंचायती करण्यात याव्या असा ठराव मंजूर करण्यात आला परंतु या ग्रामसभेमध्ये लोकसहभाग कमी असल्यामुळे व गोंधळ झाल्यामुळे सदर विषयावर योग्य ते चर्चा झाली नाही त्यामुळे हिवरखेड नगरपंचायत करीता विशेष ग्रामसभा बोलावण्यासाठी यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात २ अर्ज दिले होते त्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे आज शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हिवरखेड शहरतर्फे शिवसेना शहर प्रमुख आकाश इंगळे राष्ट्रवादी युवक कॉ. शहर अध्यक्ष सुदाम राऊत व धनंजय गावंडे ता.प्रसिद्धी प्रमुख यांनी शासनाचे कोरोना संबंधीचे नियम पाळून व हातात विशेष ग्रामसभेची तारीख द्यावी असे फलक घेऊन मूक प्रदर्शन केले आणि सदर प्रदर्शनाची दखल घेत सचिव साहेब व सरपंच यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.अकोला व गटविकासअधिकारी यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर योग्य ते कारवाही करू असे लेखी पत्र दिले …