योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर :- आज दि.3 सप्टेंबर 2021 रोजी डॉ भूषणकुमार उपाध्याय साहेब अपर पोलीस महासंचालक(वा) महाराष्ट्र राज्य मुंबई, तसेच श्वेता खेडकर पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग, नागपूर संजय पांडे साहेब, पोलीस उप अधीक्षक प्रादेशिक विभाग, नागपूर व पोलीस निरीक्षक श्रीमती वैरागडे, नागपूर विभाग यांचे मार्गदर्शनखाली महामार्ग सुरक्षा. केंद्र हद्दीत NH 353 d वर नागभीड ते ब्रह्मपुरी रोड वर सायगाठा येथे वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधनाचा कार्यक्रम पो.अधिकारी व पो. अंमलदार यांच्याकडून घेण्यात आला आहे. त्या वेळी खालील वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
1) मो.सा. चालवितांना नेहमी हेल्मेट चा वापर करावा.
2) मो.सा.चालवितांना मोबाईल फोनचा वापर टाळावा
3) गाडीचे कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावी.
4) टिबल सिट प्रवास करु नये.
5) दारू पिऊन वाहन चालवू नये.
6) समोरील वाहन केंव्हा पण थांबू शकतो म्हणून सुरक्षित अंतर ठेवून वाहन चालवावे.
7) ओव्हरटेक करतांना समोरील रोड क्लियर असल्याबाबत खात्री करूनच ओव्हरटेक करावे.
8) मो.सा.चालविताना वेग मर्यादाचे पालन करावे
9)विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये.
10)अपघात समयी मदत करा
तसेच मृत्युंजय दूत संकल्पनेची व interseptor ची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. याप्रसंगी 46 मो. सा. चालक व प्रवाशी हजर होते.


