योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर – कोरोना संकट असल्याने माझ्या आई बहिणीच जीव धोक्यात टाकायचे नाही आणि रक्षाबंधन खंडित करायचे नाही त्यासाठी आम्ही बहिणीच्या दारी येऊन राखी बांधून घेत असताना आपलं देश तिसऱ्या कोरोना लाटेच्या उंबरठ्यावर असल्याने आपली जबाबदारी ,स्वतः ची काळजी घ्यावी असे सांगत आमदार बंटीभाऊ भांगडीया म्हणाले की बंदर कोळसा खदान चालू करण्यासंदर्भात काही विरोधक विरोध करीत आहे. त्यामुळे रोजगार उपलब्ध होत नाही. पर्यावरण च्या जंगल वाचवून बंदर खदान ओपन करून हजारोना रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास देत नागरिकांनी कोरोना लस घ्यावे कारण कोरोना लस ही आपली सुरक्षा कवच असून लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. बंदर( शिवापूर )येथील रक्षाबंधन कार्यक्रमात आमदार बंटीभाऊ भांगडीया बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश सदस्य, वसंत वारजूकर, भाजप जिल्हा सचिव राजु देवतळे ,तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, पस सदस्य पुंडलिक मते , महिला तालुका अध्यक्ष माया ननावरे, माजी सभापती विनोद चोखरे , आदित्य कारेकर प्रकाश पोहनकर नाना मेश्राम बाबा ननावरे रत्नमाला मेश्राम सरपंच मनीषा ननावरे उपसरपंच आदित्य वासनिक , रमेश कंचर्लावार कल्याणी सातपुते, भारती गोडे समीर राचलवार, सतीश जाधव ,अमित जुमडे, अरुण लोहकरे किशोर बुटके उपस्थित होते. संचालन अनीरुद्ध वासनिक यांनी केले. मनी रॉय आशिष जीवतोडे , हंसराज श्रीरामे ,मिथुन सोगलकर सोमेशवर तराळे ,गणेश खिरटकर सुहास तुरा णकर विनोद श्रीरामे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.