अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर :-साहित्य चळवळीतील अनेक लेखक आणि कवीच्या शब्दातून साकारलेला ‘तांड्यातील पाऊलखुणा’ हस्तलिखित अंक समाज मनाचा वेध घेणारा असल्याचे मत बंजारा साहित्यिक डॉ शांतीलाल चव्हाण यांनी यावेळी बोलतांनी व्यक्त केले. तु. का. ज्युनियर कॉलेज पातूरचा विध्यार्थी महेश विनोद राठोड यांनी संपादित केलेल्या ‘तांड्यातील पाऊलखुणा’ हस्तलिखित अंकाच्या प्रकाशना प्रसंगीं ते बोलत होते. विविध विधायक कार्य करणाऱ्या संघटनेशी निगडित असलेले महेश राठोड यांनी याआधी ‘ नायक ‘ हस्तलिखित अंकाचे सुद्धा संपादन केलेले आहे.यावेळी प्रा देविदास राठोड डॉ सुभाष चव्हाण राहुल राठोड मनिषा चव्हाण वैभव जाधाव आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती संचलन अश्विन राठोड यांनी केले तर आभार रामगोपाल जाधव यांनी मानले.


