गणेश खराट
जिल्हा प्रतिनिधी नाशिक
नाशिक येथील सदैव सामाजिक कार्यात अग्रसर असणारी महाराष्ट्र राज्यातील एकमेव संस्था ग्लोबल इन्टरनँशनल फाऊडेशन टिम व पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने म्हसरुळ पोलीस स्टेशनचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरतकुमार सुर्यवंशी साहेबांचा पुष्पगुच्छ तसेच शाल देऊन सत्कार करण्यात आला. याप्रंसगी राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनिल परदेशी, अशोक वराडे, गणेश पेलमहाले,महेंद्र हिरे आदी उपस्थित होते. आज गणपती उत्सव निमित्ताने नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक साहेबांनी शांतता समिती व गणपती मंडळाच्या पदाधिकारी यांची मिटिंग बोलवली होती त्याप्रसंगी यावर्षीही कोविड19च्या अनुशंगाने शासकीय नियमानुसार सण साजरा शांतपणे आणि निर्बंध कायम ठेऊन साजरा करण्यासाठी आवाहन करण्यात आले अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते मान्यवरांचे मनोगत मांडण्यात आले