माजी विद्यार्थी मेळावा,खेळाडू आणि माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न….
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर (दि १ सप्टेंबर २१):- स्थानिक डॅा. एच.एन.सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात मा.प्राचार्य डॉ. किरण खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय क्रीडा दिन,माजी विद्यार्थी मेळावा, खेळाडू आणि माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डि. डि. हुशंगीबादे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा आजीवन सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती उद्घाटक म्हनुन मा. शंकरराव नाभरे, अध्यक्ष,माजी विद्यार्थी संघ डॉ एच एन सिन्हा महाविद्यालय, पातूर प्रमुख उपस्थिती म्हनुन मा. विजयसिंह गहिलोत कार्याध्यक्ष, माजी विद्यार्थी संघ,डॉ एच एन सिन्हा महाविद्यालय, पातूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण खंडारे उपस्थित होते. याप्रसंगी विचार मंचावर डॅा व्ही जी वसु, प्रा हर्षद एकबोटे, डॅा संजय खांदेल, प्रा. सुरेश लुंगे, डॅा.अनिल देशमुख, समाधान गिरे, राजु उगले भोजराज बायस, राजेंद्र बायस, गजाननराव खंडारे, गोविंदराव कुटे, मा. संजय सौंदळे, मा.आनंद भिंगे, मा. मोहन जाधव मंचावर उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. त्यानंतर प्राचार्यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॅा. किरण खंडारे यांनी केले प्रास्ताविकामध्ये त्यांनी महाविद्यालयात रुजू झाल्यापासून तर आतापर्यंतचा महाविद्यालयाचा झालेला विकास आणि प्रगतीच्या कामांचा आढावा मान्यवरांना दिला. इतक्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ग्रामीण भागातील महाविद्यालय असुनही ऑनलाईन परीक्षेमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे कार्य केले याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. मान्यवरांच्या सहकार्यामुळे या महाविद्यालयाचा विकास करण्याची सुवर्णसंधी मला मिळालेली आहे. म्हणून मी सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शना मध्ये कार्य करू इच्छितो आपण मला सहकार्य करावे अशी मनीषा त्यांनी यावेळी व्यक्त केली.यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. सुरेश लुंगे यांनी खेळाडूंच्या सत्काराचे आयोजन केले होते. यामध्ये खालील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला ज्यांनी विभागीय, राज्य, राष्ट्रीय पातळीवर महाविद्यालयाचे नाव उंचावले यामध्ये प्रामुख्याने रमेश जाधव, राजू उगले, मोहन जाधव,रवींद्र नाप्ते, मोहन राठोड, निर्भय पोहरे, विकास वानखडे, प्रशांत चव्हाण, नितेश वानखडे, योगेश राठोड, सचिन इंगळे, मंगेश गावंडे, शिवानी राठोड यांचा समावेश होता.यानंतर उद्घाटक म्हणून मा. शंकरराव नाभरे यांनी उद्घाटकीय भाषण केले यामध्ये त्यांनी सर्वप्रथम उद्घाटन झाले असे जाहीर केले. महाविद्यालयाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी माझ्या कडून जे जे काही मला करता येईल ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी प्राचार्य किरण खंडारे यांना दिले. महाविद्यालयाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे हि प्रतिष्ठा जपण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे अशा प्रकारचे विचार त्यांनी याप्रसंगी काढले. यानंतर प्रमुख अतिथी म्हनुन बोलतांना मा. विजयसिंह गहीलोत यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर क्रीडा दिनानिमित्त प्रकाश टाकला. अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणा मध्ये त्यांनी सांगितले की 1928,1932, व 1936 या तिनही ऑलम्पिक मध्ये मेजर ध्यानचंद यांनी ॲालम्पीक मध्ये महत्वपूर्ण कामगिरी केली.
त्यांनी एकुण 185 मॅचेस खेळल्या त्यामधे 570 गोल केले. दोन मॅचेस मध्ये तर त्यांनी 11 गोल केलेत. त्याचप्रमाणे हिटलर आणि मेजर ध्यानचंद यांच्यातील झालेला संवाद त्यांनी यावेळी सांगून मेजर ध्यानचंद यांना मातृभूमीचे ऋण कशा पद्धतीने फेडले याची माहिती दिली. त्यानंतर मा. समाधान गिरे यांनी विद्यार्थीदशेत मध्ये असतांना कोणकोणत्या बिकट परिस्थितीशी सामना करून महाविद्यालयाचे नाव कसे उंचावले याचे सविस्तर वर्णन आपल्या भाषणांमधून केले. महाविद्यालयाला खेळाचा वारसा लाभलेला आहे त्यामुळे सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले.अध्यक्षीय भाषणामध्ये माजी प्राचार्य डि. डि. हुशंगाबादे सर यांनी सांगितले की ४ जून १९६९ रोजी महाविद्यालयात रुजू झाल्या पासून महाविद्यालयात कशा पद्धतीने प्रगती होत गेली. याचा सविस्तर आलेख त्यांनी मांडला. आणि महाविद्यालयला असणारे डॅा एच एन सिन्हा यांच्या नावाचा उल्लेख करुन त्यांच्या पी. एफ. मधून हे कॉलेज सुरु झाले. आणि सरलाबाई व कलाबाई या दोघींनी हे महाविद्यालय संस्थेला चालवण्यासाठी दिले दान दिले याचा आवर्जुन उल्लेख केला. अत्यंत बिकट परिस्थिती मध्ये महाविद्यालय चालवितांना आलेले अनेक भावनामय प्रसंग व अनुभव त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मांडले. सोबतच महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी प्राचार्य डॅा किरण खंडारे यांना दिली.कार्यक्रमाचे संचालन डॉ. दिपाली घोगरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अरविंद भोंगळे यांनी केले.कार्यक्रमासाठी वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.