पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड दि 01: अंधानेर येथील सरपंच अशोकराव दाबके यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस निरीक्षक राजीव जितळेकर यांचे प्रमुख उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली.शासनाच्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून पोळा व गणेशत्सव एक गाव एक गणपती व विविध सामाजिक उपक्रम राबवून शांततेने उत्सव साजरा करावा असे मान्यवरांनी सांगितले. त्या प्रसंगी सहा पोलीस निरीक्षक सोनार साहेब,जाधव साहेब,बोद्रे साहेब, गुप्तचाराचे पगारे साहेब,वाघ साहेब,शांताराम काळे ,संजय पांडे, कैलास राऊत, रशीद शेख,संदिप गायकवाड, मनोज बागले, शाम जाधव,ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.
आभार प्रदर्शन एम.डब्ल्यू.पगारे ग्रामविकास अधिकारी यांनी मानले.