अजिंक्य मेडशिकर
तालुका प्रतिनिधि मालेगाव
पोषण अभियान मोहीम अंतर्गत माहे सप्टेंबर २०२१ मेडशी येथील अंगणवाडीत पोषण अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सौ. लक्ष्मीताई प्रदीप तायडे व पंचायत समिती सदस्या श्रीमती कौशल्याबाई रामभाऊ साठे यांच्या हस्ते करणायत आले. कार्याक्रमाच्या सुरवातीला बालविकास प्रकल्प अधिकारी सारीका देशमुख यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमा मध्ये बेटी बचाव बेटी पढाओ स्त्रीभ्रूणहत्या विषयी माहिती देण्यात आली, आणि त्यासंबाधित टोल फ्री क्रमांकची व या संबधीत माहिती देण्यात आली. भारत स्वतंत्रच्या अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. आणि तरंग सुपोषित विषयी माहिती देण्यात आली.पोषण महिना संपूर्ण सप्टेबर कार्यक्रमाची माहिती सांगण्यात आली. आजपासून कार्यक्रमाची सुरुवात करून पूर्ण सप्टेंबर महिना हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ईत्यादी माहिती या वेळी सांगण्यात आली कार्यक्रमाला या वेळी जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मीताई प्रदीप तायडे, पंचायत समिती सदस्या श्रीमती कौशल्याबाई साठे, बाल विकास प्रकल्प अधिकारी सारीखा देशमुख, पर्यवेक्षक साधना इथापे, विस्तार अधिकारी मदन नाईक, अगंनवाडी सेविका आरती सचिन साठे, रुपाली तायडे, मंगला घुगे, मालती राठोड, मंगला तायडे, आणि मदसनिस वनिता तायडे, संगीता तायडे, रंजना देशमुख उपस्थित होत्या .