गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:- नेहरू युवा केंद्र अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने विवेकानंद युवा बहुद्देशीय मंडळ पाथर्डी यांच्या वतीने कोरोना ची दुसरी लाट अजून संपली नसताना तिसऱ्यालाटीच भाकीत काही तज्ञांनी केल्याने संभाव्य कोविड च्या तिसऱ्या लाटी चा धोका पाहता कोरोना अजून संपला नसून त्याला संपवण्यासाठी आपल्यास नियमांचा व सतर्कतेचा विसर न पडावा यासाठी विवेकानंद युवा बहुद्देशीय मंडळ पाथर्डी च्यावतीने कोविड१९लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे त्यानिमित्त आज दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पाथर्डी येथे जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमा मध्ये कोविड व लसीकरणाबाबत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष अकर्ते यांनी मार्गदर्शन केले व आपल्या मार्गदर्शनात सर्वांनी नियमांचे पालन व लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले
मार्गदर्शनपर कार्यक्रम संपल्यानंतर लसीकरणाला सुरुवात करण्यात आली यामध्ये विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ च्या वतीने शिस्तबद्द लसीकरण व नियमांचे पालन झाले पाहिजे यासाठी आरोग्य सेवेला सहकार्य करून लसीकरण वेळी नागरिकांची होत असलेली गर्दी न होऊ देता नियमांचे पालन नागरिकांकडून झाले पाहिजे याची पुरेपूर खबरदारी घेऊन विवेकानंद युवा मंडळाच्या सर्व सदस्यांनी नियमात नागरिकांचे लसीकरण करून घेतले
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्र.सरपंच प्रकाश उगले विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ पाथर्डी चे अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंटी राऊत. आरोग्य सेविका पुष्पा कोगदे गटप्रवर्तक ललिता डांमरे आशा सेविका प्रणिता कुकडे विद्या निवाने सुनंदा भारसाकडे शुभम राऊत स्वागत झापर्डे योगेश नेमाडे रोशन नेरकर गजानन भडके शंकर विधळे कृष्णा डांमरे गौरव वाघमारे दिनेश गुजर गौरव कुकडे राहुल तायडे दीपक वाघ अक्षय कुकडे सोनू झापर्डे व नागरिक विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ पाथर्डी चे सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले











