गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील कोठा गावात गेल्या 3 वर्षा पासून तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी ची निवड झालेली नव्हती या वर्षी ग्रामपंचायतीने 29 ऑगस्ट रोजी दवंडी देऊन 30 ऑगस्ट रात्री 9 वाजे पर्यंत गावातील पोलीस पाटील यांच्या कडे इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे सांगितले होते 31 ऑगस्ट ला ग्रामसभा घेऊन तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी ठरवली होती परंतु आयोजित ग्रामसभा तहकूब करण्यात आल्यामुळे तंटामुक्ती अध्यक्षांचा विषय थांबला. तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी .विशाल ठाकरे .अंकुश बुरघाटे .वैभव गावंडे .अभिजित गावंडे .शाम कोरडे .शिवाजी गावंडे .मंगेश गावंडे यांनी अर्ज दाखल केले होते तरी ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांनी दबावाखाली येऊन ग्रामसभा तहकूब केली. ग्रामपंचायत सरपंच व सचिव याना ग्रामसभा तहकूब करण्याचे लेखी स्वरूपात कारण मागितले तर त्यांनी काही उत्तर न देता ते ग्रामसभा सोडून निघून गेले.
या प्रकारा मुळे काही संतप्त गावकऱ्यांनी व इच्छुक उमेदवारांनी ग्रामपंचायतीला बेशरम झाडाचे चे तोरण बांधून जाहीर निषेध केला.या वेळी विशाल ठाकरे, अंकुश बुरघाटे, वैभव गावंडे, अभिजित गावंडे, शाम कोरडे, शिवाजी गावंडे, मंगेश गावंडे,नंदकिशोर लढे विलास पोटे, ज्ञानेश्वर कोरडे, दत्ता लढे, शाम पोटे, संतोष कोरडे शुभम पोटे राजेश पोटे पवन पोटे अंकुश कोरडे नितीन तायडे प्रतिक ठाकरे ज्ञानेश्वर गावंडे व अन्य गावकरी उपस्तीत होते.