शोकाकुल अवस्थेमध्ये अंतिम संस्कार विविध सामाजिक संघटनांनी तसेच पत्रकार लेखक कवी संगीत कलावंत मंडळांनी दिली भावपूर्ण श्रद्धांजली
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : येथिल सुप्रसिद्ध ख्यातनाम संगीततज्ज्ञ प्रा. विलासराव राऊत सर यांच्या पत्नी सौ. नंदाताई राऊत ( 52वर्षे ) यांचे सोमवारी दि. 30 ऑगस्ट 2021 रोजी दुःखद निधन झाले. त्यांना अल्पशा आजारासाठी अकोल्यात उपचारासाठी दखल केले होते. परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना मुंबईला हलवले होते. मात्र तिथेही त्यांच्या प्रकृतीने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांना काल अकोला येथिल आयकॉन हॉस्पिटल येथे दखल करण्यात आले होते. त्यांच्या उपचारासाठी शर्तीचे प्रयत्न करूनही त्यांच्या प्रकृतीने प्रतिसाद दिला नाही. त्यांनी मृत्यूशी झुंज देत असताना आज अखेरचा श्वास घेतला.त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर रवींद्र कॉलनी खानापूर रोड पातूर येथून आज दि 30 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 1 वाजता काढून त्यांच्यावर सायंकाळी पातुरच्या हिंदू स्म्शानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत त्यांच्या पाठीमागे मंगेश व प्रफुल्ल उर्फ पप्पू दोन मुले ,जया एक मुलगी आणि इतर राऊत परिवाराचा नातवंडाचा मोठा आप्तपरिवार आहे.पातूरच्या स्मशान भूमी मध्ये स्वामी अक्षयानंद महाराज, हिवरखेड चे श्याम भोपळे, महात्मा फुले महात्मा फुले महाविद्यालयाचे शंकरराव बोचरे, पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष देवानंद गहिले, पत्रकार प्रदीप काळपाडे, वसंतराव गाडगे, प्रल्हाद निलखंन, चक्रधर महाराज ,मनोहर उगले, डॉ. श्रीकांत बोरकर, आनंदराव ढगे, कलावंत समितीचे उदय मुंडगावकर पेन्शनर संघटनेचे शेख हयात जमदार, तुळसाबाई कावल विद्यालयचे प्रशांत उंबरकार, ज्येष्ठ कलावंत गजानन दादा पोपळघट, यांच्यासह इतर मान्यवरांनी यावेळी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले आहे. सौ नंदाताई राऊत यांचे अंतिम यात्रेमध्ये हरिभक्त परायण चक्रधर महाराज राऊत, गजानन गिर्हे, विष्णू घुगे ,दामोदर बर्डे, लक्ष्मणराव बारतासे, गणेश सावकार, आकाश गाडगे, सुधाकर उगले ,शामराव फुलारी ,संजय इंगळे आदींनी धार्मिक विधिवत भजने गाऊन निरोप दिला आहे.यावेळी अनिल कुमार भोपळे अध्यक्ष महात्मा फुले शिक्षण संस्था हिवरखेड, राजेंद्र भोपळे, डॉ. प्रमोद भोपळे, अनिरुद्ध भोपळे, प्रा कौस्तुभ भोपळे, सेवानिवृत्त प्राचार्य दिनकर राव भोपळे, स्वप्निल भोपळे, अभिजीत भोपळे, स्नेहल राव भोपळे, डॉ अर्चना भोपळे ,तुकाराम निखाडे, गिरीश सातव, प्रा विशाल बावस्कार, आनंद सातव, प्राध्यापक विजय आळसे ,सुरेंद्र निंबाळकर, सशांत मोहोळ, प्राध्यापक देवेंद्र देशमुख, ज्येष्ठ भजन गायक दादाराव राखोंडे, मेजर अंबादास टप्पे,राव भोपळे, किरण कुमार खंडारे , डॉक्टर अभय भुस्कुटे, विजयसिंह गहिलोत , शिवसेनेचे शहरप्रमुख अजय ढोणे,भास्करराव कळाशिखर, विजय बोचरे, संदीप गिर्हे, विजय अत्तरकार ,सुनील वावगे, रमेश काळपांडे, गजानन वालोकार, निलेश बंड, रवी राखोंडे , प्रा प्रशांत निकम , भाऊराव महल्ले, सुनील गाडगे, संदीप देऊळगावकर ,देविदास निलखंन, डॉ. सुभाष परिहार, मुरलीधर घुगे, पुंडलिक सपकाळ , समाधान चतरकर , आनंद डोंगरे ,चंदू बारतासे, निरंजन बोंबटकार, गणेश गाडगे सह पातुर शहर तसेच तालुक्यातील तसेच बाहेर गाव वरून आलेले कलाप्रेमी संगीत साहित्य गायक नाट्य शैक्षणिक क्षेत्र सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी अंतयात्रा मध्ये सहभाग घेतला होता.
स्वामी अक्षयान्द महाराज यांचे डोळ्यात आले पाणी
त्यांच्या धर्मपत्नी गेल्या त्यांच्या हृदयाचे तुकडे झाले पत्नी आपला अविभाज्य घटक असतो लग्नानंतर बायको नेहमी बायको नसते पत्नी पत्नी नसते जेव्हा चे जेवण बनवते त्यावेळी सर्व हृदयातून ती सेवा करत असते अशा मार्मिक शब्दात स्वामी अक्षयान्द महाराज यांनी प्राध्यापक विलास राऊत यांच्या पत्नीचे सेवाभावी वृत्तीचे महत्व श्रद्धांजली पर मनोगतातून त्यांनी व्यक्त करताना त्यांचे हृदय पाणावले होते तसेच ते पत्नी बद्दल बोलताना म्हणाले की पत्नीही वकीलापेक्षा अतिशय मोलाचा सल्ला देणारी असते त्यामुळे तिच्या जाण्याने जीवनावर आघात होतो या घाटातून राऊत परिवाराला प्राध्यापक विलास राऊत यांना ईश्वर शक्ती देवो अशी सुद्धा प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
अधिक बातम्या वाचा
- शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी लक्ष्मण शिंदे यांची निवड
- जि.प.शाळा खवणे पिंपरी येथे शाळा व्यवस्थापन समिती बिनविरोध निवड
- सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची सीआयएसएफ मध्ये नियुक्ती
- सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू निषेधार्थ पैठण येथे सर्व पक्षीय ठिय्या आंदोलन
- कलावंत न्याय हक्क समितीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी विनायकराव माने