आ.धर्मरावबाबा आत्राम यांना म.रा. मराठी पत्रकार संघ अहेरीने दिले निवेदन
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली/अहेरी- गडचिरोली जिल्ह्यातील नवनियुक्त मानद वन्यजीव रक्षकाची नियुक्ती करतांना स्थानिक वन्यजीवप्रेमींवर अन्याय करून परजिल्हातील उमेदवाराची निवड केल्याने गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक वन्यजीवप्रेमीं वर अन्याय झालेलाआहे.त्यामुळे या ठिकाणची नियुक्ती रद्द करून स्थानिक वन्यजीवप्रेमीना प्राधान्य देण्यात यावे.अशी मागणी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका अहेरी कडुन देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व आदिवासी बहुल असून राज्यात सर्वाधिक वनव्याप्त जिल्हा म्हणून ओळख आहे.त्यामुळे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असून येथील जंगलामध्ये विविध प्रकारचे वन्य प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.अहेरी उपविभागात चपराळा अभयारण्य ,भामरागड अभयारण्य, कोलमार्कां अभयारण्य यांची निर्मिती करण्यात आली आहे.कमलापूर येथे हत्ती कॅम्प असून अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देतात.वन संपत्ती च्या रक्षणासाठी वन्यजीव रक्षकाचे पद महत्त्वाचे आहे.1 जून रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील उदय पटेल यांची मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.उदय पटेल यांच्यावर वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत योग्य न्यायिक कारवाई करण्याबाबतचे पत्र निघाले असून अश्या व्यक्तीला मानद वन्यजीव रक्षक पद देणे योग्य नाही.त्यामुळे त्यांच्याकडे असलेले हे पद रद्द करून गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक वन्य जीवप्रेमींची नियुक्ती करण्यात यावी.अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अहेरी तालुका कडुन देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन देताना म.रा.म.पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष मिलिंद खोंड, सचिव अनिल गुरनुले,प्रशांत ठेपाले, ओमप्रकाश चुणारकर,महेश येरावार, अमोल कोलपाकवार,अखिल कोलपकवार आदींची उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या
- ऊस जळालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या अन्यथा आंदोलन छेडू, गजानन पाटील चव्हाण
- जय शिवराय क्रीडा मंडळाच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन
- श्रीराम प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची व शिक्षकांची विज्ञान प्रदर्शनात चमकदार कामगिरी
- गुरुजी फाउंडेशन तर्फे एक हात मदतीचा ह्या माध्यमातून सालेगाव येथे दुसरा बंधारा बांधकामास सुरुवात
- कॅबिनेट मंत्रीपद इंदापूर पाणीप्रश्नासाठी लाभदायक ठरणार