अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
अकोला : ,आजच्या काळामध्ये पत्रकारिता आणि पत्रकारांना खूप कठीण काळातून जावे लागत आहे काबाडकष्ट करून पत्रकारिता करावी लागत आहे मात्र प्रामाणिक पत्रकारिता आणि सकारात्मक लिखाण करणाऱ्या पत्रकाराचा यशाचा मार्ग कुणी रोखू शकत नाही असे विचार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे पातुर तालुका अध्यक्ष देवानंद गहिले यांनी अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे आयोजित केलेल्या तपोभूमी या साप्ताहिक वृत्तपत्राच्या वर्धापन दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहांमध्ये व्यक्त केले ते पुढे बोलताना म्हणाले की रमेश समुद्रे हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिक पत्रकारिता करीत आले आहेत म्हणून आज त्यांना यश प्राप्त झाले आहे यापुढे सुद्धा आम्ही रमेश समुद्रे यांच्या पाठीशी उभे असून इतर पत्रकारांनी सुद्धा सकारात्मक पत्रकारितेला उजाळा द्यावा असे त्यांनी आवाहन करून रमेश समुद्रे यांच्या साप्ताहिक तपोभूमी व त्यांचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्यासाप्ताहिक तपोभूमी च्या प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा बोरगाव मंजू येथे साजरा करण्यात आला आहे साप्ताहिक तपोभूमी च्या प्रथम वर्धापन दिन 15 ऑगस्ट 2021 ला पहिलं वर्ष पूर्ण केल्याबद्दल स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष बोरगाव मंजू मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे उदघाटक उद्योजक रवींद्र बादुर मार्गदर्शक ह भ प अर्जुन गेनबा महाराज इंजिनीयर महादेव राठोड, विलासराव देशमुख, सुनील खेडकर ,विजय नरवाडे, श्याम पिंपळकर ,संजय वानखडे, मिलिंद बनसोड, गजानन वरवट ,ज्येष्ठ पत्रकार देवानंद गहिले , मनोहर पेटकर ,गजानन भाऊ हरणे साप्ताहिक ग्रामीण महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष मुन्ना धांडे, सुहान सोनवणे, नितीन गवळी, निलेश डोंगरे, एस जी मोहन, महादेव तायडे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्राध्यापक संजय तायडे, भाउरावजी वानखडे, डी एस पंजाबराव वर ,भारत मोरे पंचायत समिती सदस्य यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला नामदेव गवळी यांच्या कवितेचा कार्यक्रम झाला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन महापुरुष यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली यावेळी माजी आमदार हरिदास भदे यांनी मनोगतामध्ये साप्ताहिक तपोभुमी चे संपादक रमेश समुद्रे यांच्या वर्तमानपत्राची वाटचालीत , कोरोना काळामध्ये साप्ताहिक तपोभूमी वर्तमानपत्र चालविणे ही तारेवरची कसरत असून कठीण आहे ते काम सतत पत्रकार रमेश समुद्रे आपल्या लेखणीद्वारे गोरगरीब उपेक्षित वंचित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी करतात ही त्यांची खरी देशभक्ती आहे उपस्थित मान्यवरांनी साप्ताहिक तपोभूमि वर्तमानपत्राचे संपादक रमेश समुद्रे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले त्यामुळे संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव माजी नायब तहसीलदार आर व्ही गिरी यांनी रमेश समुद्रे यांच्या पत्रकारितेचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांचा सत्कार केला साप्ताहिक तपोभुमी चे स्तंभलेखक ह.भ.प. अर्जुन बारस्कर महाराज यांचा शाल श्रीफळ पुष्पमाला अर्पण करून सत्कार केला याच वेळी संपादक रमेश समुद्री यांनी त्यांना स्तंभलेखक म्हणून ओळखपत्र प्रदान केले तसेच याप्रसंगी कार्यक्रमाचे औचित्य साधून बोरगाव मंजू येथील महिला बचत गट सुषमा शिरसाट बबिता वाकोडे, वंदना तायडे ,तायडे अंजू बागडे, पूनम अंबरकर, बचत गटातील महिलांना संपादक रमेश समुद्रे यांच्या सुविद्य पत्नी चा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन परवड व साहित्यिक प्रजानंद उपर्वट यांनी तर सूत्र संचालन रमेश समुद्रे यांनी केले आभार निलेश डोंगरे यांनी मानले या कार्यक्रमाला संतोष चक्रनारायण पत्रकार , संतोष गवळी, समाधान वानखडे, सय्यद हसन बाबू , छायाताई , अनिल वानखडे, सचिन वानखडे, योगेश समुद्रे, सचिन समुद्रे, वंदना इंगळे, आम्रपाली समुद्रे ग्रामपंचायत सदस्य गुरु तायडे, प्रभाकर बागडे ,उज्वल गवई ,संजय देऊळकर ,सचिन खताळे, महादेव रावजी बहुलकर , सखाराम जीवांकडे ,अश्विन ढवळे, शरद वानखडे यांच्यासह इतर मान्यवर पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.