शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधि
अकोट : शहर आज एका घटनेने हादरले असून कोरोना लसीकरणाचे पथक असल्याचा बनाव करीत अकोट शहरात भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना आज दुपारी घडली. प्राप्त माहितीनुसार दरोडेखोरांनी घरातील तिघांना जबर मारहाण करीत तोडांत बोळे कोंबून दोराने एका खोलीत बांधून ठेवले होते. या घटनेनंतर अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शहरातील गजबलेल्या रहदारी असलेल्या जवाहर रोड लगत बुधवार वेस परिसरात प्रसिद्ध व्यापारी अमृतलाल सेजपाल हे आपल्या कुंटबासह राहतात. त्यांच्या घरी ३१ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० ते ३ वाजता दरम्यान काही महिला व पुरुष आले. त्यांनी दरवाजा वाजवून कोरोना लसीकरण चौकशी पथक असल्याचे बनाव केला. यावेळी दरवाजा वरच सेजपाल यांच्या नात देलिशा हिला मी विद्यार्थी असल्याने लस घेतली नाही सांगितले. त्यामुळे या बनावट पथकाने घरात कोणकोण आहे अशी विचारणा करताच देलिशा हिला शंका आल्याने तीने ओळखपत्र मागितले असता या दरोडेखोर टोळीतील एका महिलेने दरवाजा जोरात लोटत घरात घुसले. घरातील वयोवृद्ध अमृतलाल सेजपाल,त्यांची पत्नी इंदुबहन सेजपाल, नात देलिशा यांना मारहाण करीत तोडांत बोळे कोबंत चिकटपट्या लावल्या.तसेच दोरीने बांधून एका खोलीत कोंडून ठेवले. अमृतलाल सेजपाल यांना सशस्त्र मारहाण करीत जखमी केले. त्यानंतर घरातील सामान फेकफाक करीत कपाट फोडली.सदर घटनेने मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणाने मात्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रशचिन्ह निर्माण होत आहे.