सुष्मा खामदेवे पं. स. नागभीड यांच्या नेतृत्वाखाली खावटी वाटप
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चिमुर यांच्या वतीने आश्रम शाळा चिंधीचक द्वारा आदिवासी बांधवांना खावटी वाटप करण्याकरीता सुषमा गोपाल खामदेवे पं.स.सदस्या नागभीड यांच्या प्रयत्नाने गोविंदपूर या गावात खावटी वाटपाचे कार्यक्रम ग्रा.प.गोविंदपूर येथे पार पडले. आपल्या पंचायत समिती क्षेत्रातील आदिवासी समाजातील बांधवांना त्रास होऊ नये यासाठी सुष्मा खामदेवे पं. स. सदस्या यांनी गोविंदपूर, खरबी, सोनापूर, सारंगड, येनोली माल, धामणगाव माल,धामणगाव चक, वैजापूर या गावातील जवळपास 160 लाभार्थ्यांना गावाजवळ गोविंदपूर येथील ग्राम पंचायत मध्ये खावटी वाटपाची सुविधा उपलब्ध करून दिले. यावेळी उपस्थित सुषमा गो. खामदेवे पं.स.सदस्य, उमाजी खोब्रागडे सरपंच गोविंदपूर, ज्ञानेश्वर नेवारे उपसरपंच, मुख्याध्यापक श्री. वालदे, अरुणा हांडेकर ग्रा.प.सदस्य, सुनंदा नेवारे ग्रा.प.सदस्य, खेमराज मेश्राम ग्रा.प.सदस्य, गोपालजी खामदेवे, छत्रपती नेवारे, यशवंत काटेखाये, धनराजजी मसराम तथा ग्रा.प.गोविंदपूर वासीय. उपस्थित होते यावेळी लाभार्थ्यांनी सुषमा खामदेवे पं.स.सदस्य यांचे विशेष आभार मानले व श्री.वालदे सर मुख्याध्यापक आश्रमशाळा चिंधीचक सहकार्य केल्याबद्दल सरांनी आपल्या टिमच्या वतीने आभार व्यक्त केले.