गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:- कधी गारवा तर कधी उकाळा कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक उन्ह या बदलत्या वातावरणाचा मानवी जीवनावर विपरित परिणाम होऊन तालुक्यात खोकला ताप सर्दी अपचन , डेंगू आदीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेतयामुळे दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.घरात एकाला आजार झाला की पूर्ण घरातील सदस्य आजारी पडतात अशी भयावह स्थिति शहरा सह तालुक्यात दिसून येत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे .शहर तालुक्यात मागील आठवड्यात चार दिवस सूर्यदर्शन झाले नाही रिमझिम रिमझिम पाऊस सुरू होता यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला होता शहरांमध्ये विक्रीसाठी असलेले रिकामे प्लॉट खोलगट असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे रविवार पासून ढगाळ वातावरण पूर्णपणे निघून गेले उकाळा वाढला एकदम वातावरणामध्ये बदल झाला याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झालेला दिसून येतो शहरासह तालुक्यातील प्रत्येक घरात सर्दी खोकला ताप अपचन पोट दुखी आदीचे रुग्ण आहेत विशेष म्हणजे घरातील एक व्यक्ती आजारी पडल्यानंतर संपूर्ण घरातील सदस्य एकापाठोपाठ एक आजारी पडतात दोन-तीन दिवस औषध घेतल्यानंतर त्यांना बरे वाटते शहरातील खाजगी व सरकारी दवाखाने रुग्णांनी तुडूंब भरलेले आहेत याबाबत डॉक्टरांशी संपर्क साधला असता हे व्हायरल आहे असे सांगण्यात येते रुग्णाच्या संपर्कात इतर व्यक्ती आल्यानंतर त्यांनादेखील लागण होते त्यामुळे हे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे .
रुग्णांचा संपर्क टाळावा गर्दीत जाऊ नये घर व परिसराची स्वच्छता ठेवावी हात वारंवार धुऊन काढावे बाहेर जायचे असल्यास मास्क वापरावा प्रतिकारशक्ती टिकवून ठेवावी गर्दीत जाऊ नये उघड्यावरील पदार्थ खाऊ नये अति शीत किंवा अतिउष्ण पदार्थ सेवन करू नये आंबट व कोल्ड्रिंक्स टाळावे हे आजार व्हायरल आहेत त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांकडे जा दुखणे अंगावर काढू नका .
डॉ. महेश बोंबडे तेल्हारा