गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा :-निवडणूक आयोगने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला असून १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण होणारी व्यक्ती मतदार यादीत नाव नोंदणी करू शकते. तसंच काही दुरुस्ती असल्यास त्या देखील करता येतील. १ नोव्हेंबर २०२१ ला प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल तर ५ जानेवारी २०२२ ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मतदार यादीत नाव असणे अनिवार्य आहे १८ वर्षे वरील वयाची कोणतीही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून नियमितपणे पुनरिक्षण कार्यक्रम घेतल्या जातो तरीही काही कारणामुळे वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेली असल्यावरही मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करणे शक्य होत नाही ज्यांचे यादीमध्ये नाव समाविष्ट करून द्यायचे राहिले अशा १८ वर्षावरील सर्व व्यक्ती व १ जानेवारी २०२२ ला वयाची अठरा वर्षे पूर्ण करतात अशा व्यक्ती या विशेष कार्यक्रमांतर्गत मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात. काही व्यक्तींकडे मतदार ओळखपत्र आहे पण आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याची खातरजमा प्रत्येकाने करणे गरजेचे आहे आपले नाव तपासण्यासाठी निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर तपासणी करावी तसेच काही व्यक्तीचे मतदार यादी वर छायाचित्र आलेले नाही अशा व्यक्तींनी आपले छायाचित्र जोडून घ्यावे काही व्यक्तींकडे मतदार ओळखपत्र नाही त्यांनी ओळखपत्र मिळवण्यासाठी अर्ज भरून द्यावा दोन ठिकाणी नावे असल्यास एका ठिकाणचे नाव कमी करण्यासाठी देखील अर्ज करता येईल १८ वर्षावरील कोणतीही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केला जात आहे तसेच प्रत्येकाने याबाबत जागरुक राहणे आवश्यक आहे.
केंद्रस्तरीय अधिकार्याकडे यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादी आहे त्यामध्ये आपले नाव आहे की नाही असल्यास बरोबर आहे की चुकले या सर्व बाबी तपासून योग्य तो अर्ज भरून केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे द्यावा निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा.आपले नाव मतदार यादी दाखल करून घ्यावे व मतदानाचा पवित्र हक्क प्रत्येकाने पार पाडावा.
डॉ. संतोष येवलीकर तहसीलदार तेल्हारा