सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली/आलापल्ली- अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील व्यापारी संघटना कडुन वर्षभर विविध समजपयोगी उपक्रम राबविने सुक्त गुणांना वाव देणे आणि कोरोना काळात लोकांना अन्न धान्य वाटप करणे अशा विविध सेवा देण्यास नेहमी तत्पर राहतात.नुकतेच जाहीर झालेल्या 2021 चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार चे मानकरी आलापल्ली येथील रहिवासी असलेले शिक्षक खुर्शीद शेख हे सिरोंचा तालुक्यातील असरल्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. त्यांना शासनाकडून राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाले.त्या निमित्य व्यापारी संघटना आलापली कडुन सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आले. खुर्शीद यांनी आपल्या शाळेत जे उपक्रम राबवले ते देशपातळीवर प्रत्येक ठिकाणी राबवायला पाहिजे आणि यामुळेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल असे व्यापारी संघटनेच्या विविध सदस्यांनी आपले मत व्यक्त केले. त्यावेळी खुर्शीद शेख यांनी आपल्या भाषणात मृत शाळाला जीवनदान देऊन आनंदवन बनविले, शाळेला एक नवीन शितिजा कडे नेले मुलांना मी रिपोर्टर म्हणून तयार केले मुलांना व्हिडिओ संकल्पनेतून मुलांना व्हिडिओग्राफी आणि एक्टिंग ची संधी दिली आणि लघुपट शैक्षणिक भाषा संवाद करणे, मुलांना खेळाबद्दल रुची आनणे आणि हरित क्रांतीचे धडे देणे, बाल व्यसन मुक्ती चे धडे देणे, समाजाला शाळा शी जोडले , ट्रायबल टू ग्लोबल , कोरोना साथ रोगा शी लढणे ,भाषिक उपक्रम राबविणे, मुलामधे खेळात रुची वाढविणे ,शाळेत मुलांमधील 40 ची पटसंख्या होती त्या शाळेत दोनशे पर्यंत विद्यार्थी वाढविले मुले आपल्या आवडीने शाळेमध्ये येऊ लागले असे अनेक उपक्रम राबविनार असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला अध्यक्ष स्थान म्हणून गावातील प्रथम नागरिक आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकीशोर पांडे, उपसरपंच विनोद अकनपल्लीवार, माजी व्यापारी संघटना अध्यक्ष दिलीप बिरेल्लीवार,राकेश गण्यारपवर, व्येकटेश मद्यर्लावार, विजय गुप्ता, साईनाथ मिरालवार, ईरफान शेख, विवेक चेलियालवार प्रकाश हलधर, रहीम शेख आदी सर्व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.पञकार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद खोंड यांनी संचालन केले तर व्यापारी संघटनाचे उपाध्यक्ष अमोल कोलपाकवार यांनी प्रास्ताविक केले.