सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली / कुरूड – आरोग्य प्रबोधिनी,आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट व समाज बंध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कुरुड येथील किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी विषयी जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रशालाताई गेडाम, मान्यवर उपस्थित जयश्री पराते, जिल्हा परिषद हायस्कूल, प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुर्यप्रकाश गभने, स्नेहल पवार, सचिन आशासुभाष होते.शास्त्रशुद्ध माहिती देत पौगंडावस्थेत होणारे शारीरिक भावनिक बदल, पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी, आहार, स्वच्छतेच्या सवयी, शोषक साहित्याचा वापर व विल्हेवाट याविषयी हसतखेळत माहिती देण्यात आली. शिवाय पाळीविषयी समाजात असणारे गैरसमज व अंधश्रद्धा दूर करत पाळीविषयी शास्त्रीय दृष्टिकोन तयार करण्यावर सत्रात भर देण्यात आले.सत्रानंतर प्रायोजक आदित्य बिर्ला एजुकेशन ट्रस्ट मार्फत मुलींना मोफत पॅडचे ही वाटप करण्यात आले. ग्रामीण भागात या विषयी असणारा संकोच व अज्ञान दूर करण्यासाठी बिर्ला ट्रस्टने ही सत्र आयोजित करण्यात केली. सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य,शिक्षक व ग्रामपंचायतींचे मोलाचे सहकार्य यात लाभले.जिल्हा परिषद हायस्कूल व राधेश्यामबाबा विद्यालय येथील साठ मुली यात सहभागी झाल्या.कार्यक्रमात प्रास्ताविक डॉ. सुर्यप्रकाश गभने यांनी केले,संचालन आरती पुराम, आभार रोहिणी सहारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्चना उईके,सुनील रेहपडे यांनी सहकार्य केले.