गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना विषाणू महामारी मुळे लाँक डाऊन काळात राज्यातिल सर्व मंदिर धार्मिक स्थळे बंद केले असुन आज संपुर्ण राज्यात वाईन शाँप वाईन बार व इतर मार्केट बाजार पेठा सुरु केल्या असुन फक्त मंदिर आणी धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत ती उघडण्यास राज्यातील सरकार ने परवानगी दिली नसुन त्याचा आज दि 30 आँगष्ट रोजी दुपारी 3 वाजता शहरातील सराफ लाईन स्थित बडा बालाजी मंदिर समोर भाजपा तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार, नगर परिषद अध्यक्षा सौ जयश्रीताई पुंडकर यांच्या प्रमुख उपस्थित शहरध्यक्ष महेंद्र गोयनका यांच्या नेतृत्वात घंटानाद आदोलन करण्यात आले.यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषना देण्यात आली याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे, सरचिटणीस रवि गाडोदिया,भाजयुमो शहरध्यक्ष गणेश इंगोले, ज्ञानेश्वर सरप,नगर सेवक अनुप मार्के,सुनिल राठोड, अतुल विखे,सुनिल भुजबले, विजय देशमुख,श्याम वानखडे,रवि शर्मा, शिवा खाडे यांची उपस्थिती होती.











