अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर : कृष्ण जन्माष्टमी उत्सव सोमवार ३० ऑगस्ट रोजी आहे. हा सण प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात कृष्ण पक्षाच्या अष्टमीला साजरा केला जातो. सोमवार असल्याकारणाने हा या वर्षाचा चौथा श्रावण सोमवार देखील आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी, या दिवशी विष्णुदेवाने श्रीकृष्णाच्या रुपात मथुरेत जन्म घेतला. मथुरेत जन्म झाल्यानंतर कृष्ण गोकुळात गेला.जिथे त्यांचा जन्मोत्सव धूम-धडाक्यात साजरा केला जातो. चारही बाजूला आनंद भयो, जय कन्हैया लाल की हे संगीत ऐकायला मिळते. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भक्त उपवास ठेवतात. आणि श्रीकृष्णाला अधोरेखील करणारे व्यंजन बनवले जाते. मध्य रात्री जन्मानंतर श्रीकृष्णाला नवीन पोशाख घातला जातो तसेच ५६ भोगाचा प्रसाद दाखवला जातो. पण हे ५६ भोग का दाखवतात याचे करण माहिती आहे का? आणि हि परंपरा कधी सुरू झाली, चला तर जाणून घेऊया…
श्रीकृष्ण जेव्हा यशोदामाता आणि नंदलाल यांच्याबरोबर गोकुळात राहायचे तेव्हा कृष्णाची आई त्यांना दिवसातून ८ वेळा स्वतःच्या हाताने जेवायला घालायची. एके दिवशी स्वर्गाचा राजा इंद्रदेवाच्या पूजेचे मोठ्या स्वरूपात आयोजन केले जाते. कृष्णाने नंदलाल यांना विचारले कि हे आयोजन कशासाठी केले जात आहे. नंदलाल यांनी सांगितले की देवराज इंद्राची पूजा करण्यासाठी हे आयोजन आहे. या पूजेने इंद्रदेव प्रसन्न होऊन चांगला पाउस पाडतील, त्यामुळे जमिनीत चांगले पिक उगवेल. अश्या या वर्षाचा चौथा श्रावण सोमवार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी,दिवशी भंडारज येथील कु. प्रतीक्षा भांगे हिने आपल्या संकल्पनेतून आकर्षक सजावट व दीप प्रज्वलीत करून रंगीबेरंगी फुलांनी श्रीकृष्णाची उत्कृष्ट प्रतिकृती रांगोळी मध्ये साकारली आहे.