अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर शहरातील खानापूर रोड व आगीखेड ते पार्डी बऱ्यास मुख्यरस्त्याची दुरावस्था झाली आहे मोठ मोठे खड्डे पडले असून पावसाच्या पाण्याने रस्त्यात पानी व चिखल साचल्याने रस्ता वाहतुकीस योग्य राहला नसून अपघात होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.पातूर शहराची बाजार पेठ मोठी आहे जवळपासच्या खेड्यातील लोकांची वरदळ खरेदी साठी पातूर मध्ये नेहमीच असते
स्थानिक विविध सघटनांनी, समाजसेवीनि वारंवार रस्त्याची मागणी करूनही उपोषण, आंदोलन करूनही रस्त्याचे काम रखडलेलेच आहे रस्ता सा. बा.विभागाच्या अधीनस्त येत असून सबंधित विभागने लक्ष देण्याची गरज आहे
प्रशासन विषयी नागरिक मध्ये रोष निर्माण झाला आहे.नवीन रस्ता तयार करण्याची मागणी जोर धरत आहे.
प्रतिक्रिया –
पातूर तालुक्यातील बऱ्यास रस्त्यावर खडेच खड्डे आहेत ते लवकरात लवकर बुजवावे
नवीन रस्ता तयार करावे ही शासनाने लक्ष्यात घेण्याची गरज आहे. खेड्या गावात सुद्धा ही परिस्तिथी आहे यावर उपाय योजना सुरू करण्याची गरज आहे.
अमोल प्र. करवते
प्रहार सेवक, पातूर