वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या माजी जिल्हा महासचिव हर्षदा डोंगरे आणि प्रितेश ठाकूर यांचा प्रहार मध्ये प्रवेश.
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाची सदस्य नोंदणी सुरू असताना अकोला जिल्ह्यातील युवावर्ग मोठ्या संख्येने प्रहार मध्ये सामील होतोय. इतर पक्षातील अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे. पालकमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शुक्रवारी प्रहार चे निलेश पाटील ठोकळ, मनोज पाटील, बॉबी पळसपगार यांच्या नेतृत्वात ऑल इंडिया पँथर सेनेचे माजी अकोला जिल्हा प्रमुख अंकुश तायडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माजी जिल्हा महासचिव हर्षदा डोंगरे आणि प्रितेश ठाकूर यांनी अनेक कार्यकर्त्यांसह प्रहार मध्ये प्रवेश घेतला. यावेळी अंकुश तायडे आणि कार्यकर्त्यांनी अकोला जिल्हा रुग्णालयात रक्तदान करून नवीन आदर्श ठेवला.