मोफत आरोग्य शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
भिगवन येथील प्रा.सागर घरत सरांच्या ज्ञानसागर ड्रीम सायन्स अकॅडमीच्या वतीने प्रथम वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला भिगवन तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर घरत यांनी करत अकॅडमीच्या स्थापनेपासूनची वाटचाल उलगडून सांगितली. ग्रामीण भागातील गरजू तसेच वडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना अकॅडमीमार्फत मोफत शिक्षण देण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.कार्यक्रमादरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी अकॅडमीबाबतचे आपले सकारात्मक अनुभव मनोगतातून व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनीही अकॅडमीच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव मायाताई झोळ या होत्या. तसेच भिगवन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, पंचायत समिती सदस्य हेमाताई माडगे, भिगवन ग्रामपंचायतचे सरपंच गुराप्पा पवार, सचिन शेठ बोगावत, तक्रारवाडी चे सरपंच शरद वाघ, तुषार क्षीरसागर, आप्पासाहेब गायकवाड, आकाश पवार, दीपिका शिरसागर, सीमाताई काळंगे, जावेद शेख, नारायण बंडगर, दादासाहेब थोरात, जालिंदर पानसरे, स्वप्निल बंडगर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाला आजी-माजी विद्यार्थी, पालक व स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. सर्वांनी अकॅडमीच्या उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.









