पोलीस जवानांचे मनोबल उंचावण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन.
सौ.निलीमा बंडमवार
उप जिल्हाप्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/पेरमिली- पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक सो मुंडे, व अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील उप पोलीस स्टेशन येथे मुक्तीपथ संघटना व पेरमिली पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने राखी विथ खाकी चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.रक्षाबंधन म्हटलं म्हणजे भाऊ आणि बहिणीचे एक अतूट नात्याचा सण असतो अशा सणाच्या दिवशी पोलीस हे आपल्या घरी जाऊ शकत नाही किंवा त्या भगिनी आपल्या भावाला राखी बांधू शकत नाही. अशा जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी राखी विथ खाकी हा कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमात मुक्ती पतसंस्थेचे तालुकाप्रमुख चव्हाण यांनी व्यसनमुक्ती बाबत मार्गदर्शन केले.तसेच पत्रकार आसिफ पठाण यांनी पोलीस व जनता संबंध बाबत मार्गदर्शन केले तर पेरमिलीचे प्रभारी अधिकारी पंकज सपकाळे यांनी उपस्थित बचत गटांचा महिलांच्या आभार मानले व खाकी आपल्या सेवेसाठी नेहमी हजर राहील व नेहमी आपले रक्षण करेल पोलीस आपल्या दारी ही संकल्पना मांडली.या कार्यक्रमात सीआरपीएफ चे अधिकारी रंजन दास, प्रभारी अधिकारी पंकज सपकाळे, पीएसआय गंगाधर जाधव, पेरमिली गावचे सरपंच किरण नैताम, डॉ.शंकर दुर्गे, श्रीनिवास बंडमवार ,आसिफ पठाण,गिता दुर्गे,परिसरातील महीला बचत गट तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











