सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर तालुक्यातील कासारखेड ग्रामपंचायत सध्या डेंग्यू ची लक्षणे दोन व्यक्तींमध्ये आढळून आली होती.त्यांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र कळबेंश्वर यांनी प्राथमिक उपाय योजना केल्या नंतर ही गावातील ऋग्ण संख्या वाढण्याची शक्यता नाकारु शकत नाही . त्याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांना सतिश मवाळ यांनी एस एम एस करून माहिती दिली व त्यांणी गट विकास अधिकारी यांना कोरोणाच्या रूग्ण संकेत घट झाली आहे .लाट ओसरली असल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे.या संकटातून मोकळा श्वास घेत असतांनाच साथ रोगांचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत डेंग्यू रुग्ण संख्या वाढू नये त्याबाबत तुरंत उपाय योजना करण्याबाबत सुचवले गटविकास अधिकारी यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून उपाययोजना करण्याबाबत कळविले त्यांनी तुरंत प्राथमिक वैद्यकीय अधिकारी कळबेंश्वर यांना त्याबाबत कळविण्यात आले त्यांनी ग्रामपंचायत कासार खेड ला धुळ करण्याबाबत निर्देश दिले त्या अनुषंगाने ग्रामपंचायत सरपंच संतोष मवाळ यांनी ग्रामपंचायत च्या वतीने औषध आणून आज सायंकाळी फवारणी केली त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होती संदर फवारणी ची मेहनत ग्रामपंचायत शिपाई दत्ता बळहे विनायक मवाळ गजानन गेडपे प्रदीप मवाळ यांनी म घेतली आहे.सदर फवारणी करते वेळी आरोग्य विभागाचा कर्मचारी तसेच गावातील सचिव हजर नसल्याने त्यांच्या विषयी नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.