गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा- तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खेलदेशपांडे,उबारखेड,नर्सिपुर,या पंचगव्हाण परिसरात जोरात अवैधरित्या दारु वाहतूक व विक्रि होत असून वरली मटका,तितली भवरा, या विविध अवैद्य धंद्याचा चांगलाच उत आलेला आहे सार्वजनिक ठिकाणी बस्थानक,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे प्रांगण,उर्दू शाळा,आठवडी बाजार,प्राथमिक आरोग्यकेंद्र,अंगणवाडी,स्मशानभूमी परिसर यासह विविध चौकाचौकांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूविक्री,वरली-मटक्याचे प्रमाण वाढले आहे सार्वजनिक ठिकाणी दिवस-रात्र नशा करणाऱ्यांची मैफिल बसलेली असते तर चक्क ठिकठिकाणी वरली बहाद्दरांनी आपली टिन- पत्र्याची दुकाने सजविली आहेत
अवैध धंद्यामुळे कित्येक महिलांचे संसार उध्वस्त झाले आणि कित्येक होण्याच्या मार्गावर आहेत गावातील महिला,पुरुष व तरुणांनी कित्येक वेळा एकत्रित येऊन तहसील कार्यालय,जिल्हाधिकारी, तेल्हारा व अकोला पोलिस प्रशासन, पालकमंत्री यांच्या कार्यालयावर धडक देऊन निद्रिस्त झालेल्या प्रशासनाला जागे करण्याचे काम केले परंतु कुंभकर्णाच्या झोपेत असलेले प्रशासन अद्यापही जागे झालेले नाही काही वर्षांपूर्वी गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन स्वबळावर अवैध धंदे बंद केले होते मात्र पुन्हा अवैध धंदे करणारे चांगलेच सक्रिय झाले आहेत यामुळे महिला,विद्यार्थी-विद्यार्थ्यीनी,रूग्णालयात येणारे रूग्ण,प्रवासी व गावातील सुज्ञ नागरिक यांना नाहकचा त्रास सहन करावा लागतो आहे या कारणास्तव परिसरातील नागरिकांनी पुन्हा एकत्रित येऊन या अवैध धंदया विरोधात एल्गार पुकारला असून आज ता.26 गुरूवार रोजी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नागरिक व ग्रामपंचायत च्या ठरावा निशी निवेदन दिले असुन पोलीस प्रशासना मार्फत कठोर कारवाई ची मागणी केली आहे थातुरमातुर कारवाई झाल्यास व गावातील अवैध धंदे तात्काळ बंद न झाल्यास तेल्हारा पोलीस ठाण्यात उपोषण करण्याची तयारी करू असे नागरिकांनी साप्ताहिक अधिकारनामा च्या प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले आहे.











