अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव : तालुक्यातील मेडशी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर, कपिल वस्तु बौद्ध विहार येथे जिल्हा परिषद सदस्या सौ.लक्ष्मीताई प्रदिप तायडे यांनी वाशीम, अकोला, बुलढाणा विधान परिषद सदस्य गोपिकिशन बाजोरीया ( आमदार ) यांच्या निधीतून पंधरा लक्ष रूपयांचा डोम मंजुरात करून आणला आहे. या डोमचे लवकर काम सुरू होणार आहे. तर मेडशी जिल्हा परिषद सर्कल मध्ये विविध प्रकारचे विकासचे कामे करण्याचे धाडस जिल्हा परिषद सदस्या तायडे यांनी घेतले आहे. मेडशी जिल्हा परिषद सर्कल ही आदिवासी, शेत मजुर वर्गाचा व गोर गरीब जनतेचा सर्कल आहे. या आदिवासी दुर्गम भागातील लोकांच्या हितासाठी, गावाच्या विकास कामासाठी जिल्हा परिषद सदस्या तायडे सदैव तत्पर असतात.मेडशी येथे बौद्ध कपिल वस्तु मोठे प्रांगण आहे या ठिकाणी डोमची आवश्यकता असल्याने जिल्हा परिषद सदस्या यांनी डोम साठी पाठपुरावा करून डोम मंजुरात करून घेतला. मेडशी मध्ये जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मीताई प्रदिप तायडे यांचे कौतुक केले. बबलू जैन, गजानन शिंदे माजी पं. स. सदस्य, प्रदिप तायडे माजी प. स. सदस्य, अभिजीत मेडशीकर ग्रा. प. सदस्य, कैलास ढाले ग्रा. प. सदस्य, अमोल तायडे ग्रा. प. सदस्य, नितीन तायडे, सुधाकर राठोड, पिंटु पाटिल, सुभाष तायडे, मोहन राठोड, समाधान तायडे, संजय चोथमल, संजू भागवत, रमजान गौरे, नितीन कुदळे, पंजाब सोनोने, जगदीश इंगळे, बळी राजा मित्र मंडळ मेडशी सर्कल व समस्त गावकरी मंडळी यानी गावात व परिसरात होत असलेल्या विकास कामा बद्दल आनंद व्यक्त केला आहे.


